ईटकूरात नविन उपडाकघर ऑफीसचा धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर कळंब धाराशिव विधानसभा मतदार संघाचे आमदार कैलास घाडगे - पाटील यांच्या शुभहस्ते उदघाटन सोहळा
देशभक्त न्युज - ईटकूर प्रतिनिधी / -
कळंब तालुक्यातील ईटकूर येथे पूर्वीपासून पोष्ट ऑफीस होते सध्या या पोष्ट ऑफीसची उपडाकघर अशी बडती झाली असुन या उपडाक - घरासाठी ग्रापच्या . सचिवालयाच्या ईमारती वरील मजल्यावर प्रशस्त अशी येणाऱ्या नागरीकांची हेळसांड होवू नये अशा मोकळ्या परिसराच्या इमारतीत सुरुवात करण्यात आली असून या नविन वास्तु मध्ये
दिनांक १० मे २०२५ रोजी या उपडाकघर (पोस्ट ऑफिस) उपक्रमाचा शुभारंभ धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर कळंब धाराशिव विधानसभा मतदार संघाचे आमदार कैलास घाडगे - पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले .
या कार्यक्रमास डाकविभागाचे सहाय्यक डाक निदेशक, छ. संभाजीनगर ए .के . शेख , धाराशिव डाक अधीक्षक , संजय आंबेकर , ईटकूर उपडाकघराच्या रिंकु ताकपिरे यांच्यासह मा . जिप .कृषि सभापती प्रताप पाटील, शिवसेना कळंब शहर प्रमुख विश्वजीत जाधव, प्रदीप फरताडे, शिवसेना युवा नेते अभयसिंहराजे अडसूळ, सरपंच सौ. मोहरबाई कस्पटे , शिवसेनेचे निष्ठावंत नेते बाळासाहेब गंभीरे, विठ्ठल माने सर, पवन सावंत, विजू दादा माने यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती . संपन्न झालेल्या कार्यक्रमास डाक विभागातील अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ यांची मोठी उपस्थित होती.
हा उपक्रम म्हणजे ग्रामीण भागात सरकारच्या सेवा पोहोचवण्याचा एक महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे प्रतिपादन खा . निंबाळकर यांनी व्यक्त केले तर आ . घाडगे - पाटील म्हणाले की , मतदार संघातील जनतेच्या विकासासाठी आपण सदैव प्रयत्न शिल आहे .
ईटकूर उपडाकघर येथून आता जनतेसाठी या पुढील सुविधांचा सामावेश असुन आता नागरीकांना बऱ्याच सुविधी गावातच मिळणार आहेत यामध्ये प्रामुख्याने सर्व डाक योजना लाभ ,डीबीटी फॉर्म भरून थेट खात्यात पैसे, सुकन्या योजना, विमा योजना, ५४९ रुपयांमध्ये १० लाखांचा विमा कवच , आधार दुरुस्ती या सुविधा मुळे या भागातील लोकांना आता तालुक्याला जाण्याची गरज भासणार नाही .
यावेळी मान्यवरांच्या हस्ते कु .संशिका पुरुषोत्तम शिंदे व आयुष्का बाळासाहेब शिंदे या लहान बालीकांचे आधार कार्ड मान्यवरांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आले .तसेच तालुक्यातील प्रत्येक जिल्हापरिषद गटात ईटकूर प्रमाणे उपडाकघर सुरू करण्यासाठी आंम्ही प्रयत्न करू असेही शेवटी खासदार व आमदार यांनी सांगितले .




