Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

ईटकुर व तेरखेडा येथे नवीन उपडाक घर कार्यालयाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

 ईटकुर व तेरखेडा येथे नवीन उपडाक घर कार्यालयाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न



               देशभक्त न्युज - धाराशिव प्रतिनिधी / -

कंळब तालुक्यातील इटकुर येथे नवीन उप डाक घर कार्यालयाचे उद्घाटन खा ओम राजेनिंबाळकर यांच्या हस्ते झाले व धाराशिव कळंबचे आ. कैलास पाटील उपस्थित होते. या ठिकाणी उप डाकघर कार्यालय मंजूर करणे साठी अनेक दिवसापासून प्रयत्न करण्यात येत होते ही बाब खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या प्रश्नांमध्ये तत्काळ लक्ष घालत माननीय मंत्री महोदयांचे पत्रव्यवहार करून ईटकुर येथील कार्यालय मंजूर करणेबाबत विनंती करण्यात आली होती यानंतर माननीय मंत्री महोदयांनी सदर कार्यालय निवडणूक झाल्यानंतर सुरू होईल असे पत्राद्वारे कळवले होते तदनंतर 413625 या पिन कोड सह नवीन उपडाक घर कार्यालय सुरू करण्यात आले आहे .

ईटकुर हे जिल्हापरीषद सर्कल चे गाव असुन येथे कोणतीही राष्ट्रीयकृत बॅकेची शाखा नसल्याने पंचक्रोशीतील   25 ते 30 हजार लोकांना सर्व बँकिंग सुविधा उपलब्ध होणारा असून सर्व प्रकारच्या डीबीटी पिक विमा सामाजिक अनुदान पीएम किसान निधी यासारखे अन्य शासनाच्या योजनेचे पैसे निशुल्क या कार्यालयातून मिळणार असून नागरिकांची होणारा त्रास व वेळ वाचणार असल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान दिसून येत आहेयाचबरोबर वाशी तालुक्यातील तेरखेडा पत्र क्रमांक D o no BDG-99/6/2025-building –Dop या पत्रा द्वारे खा. ओमराजे निंबाळकर यांना  दिली  आहे. पुर्वी तेरखेडा व परीसरातील नागरीकाना येरमाळा येथे जावे लागत होते यामुळे तेरखेडा परीसरातील गैर सोय दुर होऊन बॅकीग च्या सर्व सुविधा तेरखेडा येथे उपलब्ध होनार असुन नागरीकाने याचा लाभ घ्यावा असे अव्हान केले आहे. तदनंतर 413626या पिन कोड सह नवीन उपडाक घर कार्यालय सुरू करण्यात आले आहे


तसेच धाराशिव जिल्ह्यातील लोकसंख्या व उपलब्ध कार्यालय या यांच्यामधील आढावा घेतला असता जवळपास दहा उपडाक घर कार्यालय व 150 पेक्षा जास्त डाकघर कार्यालयाचे प्रस्ताव मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवले असून यापैकी 126 ठिकाणी नवीन कार्यालय मंजूर करण्यात येथील अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे. याचबरोबर धाराशिव येथे कार्यरत असलेले विभागीय कार्यालय लातूर येथे स्थानांतरित झाल्यानंतर धाराशिव साठी पुर्वीचे स्वतंत्र विभागीय कार्यालय सुरू करण्यासाठी दिनांक 29/12 2024 रोजी माननीय मंत्री महोदय यांना पत्र दिले असून पुर्वीचे विभागीय कार्यालयासाठी ची प्रक्रिया सुरू असून ते लवकरच मंजूर होणार असल्याचे देखील माहिती देण्यात आली .



धाराशिव जिल्ह्यातील पोस्ट खात्याच्या जुन्या इमारतीचे नवीन बांधकाम करण्याचे प्रस्ताव अर्थ मंत्रालय आकडे निधी मंजूर साठी पाठवले होते सदर प्रस्तावास मंजुरी देण्यात आली असून जिल्ह्यातील जीर्ण इमारतींचे ठिकाणी नवीन बांधकाम करण्यात येणार आहे.

याचबरोबर गोवर्धन वाडी येथे नवीन डाक घर कार्यालय तसेच वाशी तालुक्यातील पोस्ट कार्यालयास स्वतःचा एसबीआय बँक  खाते क्रमांकासाठी सी पी एम जी यांच्याकडे पाठपुरावा सुरू असून जिल्ह्यातील पोस्ट खात्यामध्ये सुधारणा करण्यासाठी जो काही निधी लागेल तो उपलब्ध करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उद्घाटन प्रसंगी बोलत असताना व्यक्त केले .

या कार्यक्रमाला  ए. के. शेख (सहायक डाक निदेशकछ. संभाजीनगर) संजय आंबेकर(डाकअधीक्षक,धाराशिव)  

दिलीप घोलप (मा. सरपंचतेरखेडा) प्रशांत बाबा चेडे जिल्हाप्रमुख  रणजीत पाटील,तालुकाप्रमुख  तात्या गायकवाड,कांतीलाल बोराना,शंकर जाधव,उद्धव साळवी,रईस भाई मुजावर, विश्वजीत जाधव, प्रताप पाटील, आबा बावळे, संजय होळे उपस्थित होते. संजय अंबेकर डाकघर अधीक्षक धाराशिव विभाग  एस .जी .गायकवाड asp धाराशिव उपविभाग श्रीकांत माने asp tour बी. सी . माळी व्ही एन पाटील यशवंत वाघमारे ए .के . शेख adps छत्रपती संभाजीनगर रिजन कळंब तालुक्याचे पोस्टमास्तर कुंभारव इतर पोस्ट विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.