Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

उद्या धाराशिवमध्ये भव्य बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन

 डॉ. भीमराव आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती


देशभक्त न्युजधाराशिव प्रतिनिधी  / - 

येथील भारतीय बौध्द महासभा शाखेच्यावतीने भव्य बौध्द धम्म परिषदेचे आयोजन दि.१८ मे रोजी करण्यात आले आहे. या परिषदेत भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर हे मार्गदर्शन करणार आहेत.

धाराशिव शहरातील छत्रपती नगर परिषदेच्या शिवाजी महाराज नाट्यगृहात सकाळी ९.३० ते दुपारी ४ या वेळेत बौद्ध धम्म परिषद होणार आहे. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी राजश्री शांताराम कदम या असणार आहेत. तर राष्ट्रीय उपाध्यक्ष अ‍ॅड. एस.के. भंडारे, महाराष्ट्र अध्यक्ष यु.जी बोराडे, राज्य सरचिटणीस अशोक केदारे हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी सोलापूरचे जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब वाघमारे, नागसेन माने, हणमंत प्रतापे, अ‍ॅड. दिलीप निकाळजे, अ‍ॅड. किशोर पायाळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या धम्म परिषदेत भिक्खु संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष भन्ते महावीरो थेरो, भिक्खु संघाचे सदस्य सारिपुत्त थेरो, तगर भूमीचे संस्थापक अध्यक्ष भन्ते सुमेधजी नागसेन हे प्रमुख धम्मदेसना देणार आहेत.या धम्म परिषदेमध्ये सकाळी ९.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात धव्जारोहण, सामुहिक त्रिशरण पंचशील, समता सैनिक दलाची मानवंदना व अभिवादन त्यानंतर रॅलीस प्रारंभ होणार आहे. तर दुपारी १२ वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात परिषदेचे उद्घाटन होणार आहे. तसेच दुपारी ३ वाजता धम्म दिक्षा सोहळा कार्यक्रम तर दुपारी ४ वाजता धम्म परिषदेचा समारोप होणार आहे. भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव आंबेडकर हे 'बौध्दगया महाबोधी महाविहार आणि प्राचीन बौध्द तीर्थक्षेत्रे इतिहास व सद्यस्थिती' या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या भव्य धम्म परिषदेस जिल्ह्यातील उपासक, उपासिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजक भारतीय बौध्द महासभा, समता सैनिक दलच्या पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.