भारतीय जनता पार्टी कळंब ग्रामीण पूर्व मंडळ अध्यक्षपदी अरुण चौधरी आणि कळंब ग्रामीण पश्चिम मंडळ अध्यक्षपदी दत्ता साळुंखे तर कळंब शहर मंडळाच्या अध्यक्षपदी मकरंद पाटील, यांची नियुक्ती
देशभक्त न्युज - कळंब प्रतिनीधी / -
भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक मजबुतीसाठी भारतीय जनता पक्षाचे नूतन जिल्हाध्यक्ष दत्ता (भाऊ) कुलकर्णी यांनी पक्षाचे संघटनात्मक काम अधिक जोमाने व बळकट व्हावे यासाठी संघटनात्मक बांधणीच्या पातळीवर जिल्ह्यातील आठ मंडळा साठी नवीन अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत यामध्ये
कळंब तालुका स्तरावर नवे अध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहेत. कळंब शहर मंडळाच्या अध्यक्षपदी मकरंद पाटील, कळंब ग्रामीण पूर्व मंडळ अध्यक्षपदी अरुण चौधरी, कळंब ग्रामीण पश्चिम मंडळ अध्यक्षपदी दत्ता साळुंखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे .
याविषयीचे पत्र जिल्हाध्यक्ष दत्ता ( भाऊ ) कुलकर्णी यांनी नवनियुक्त मंडळ अध्यक्ष यांना दिले असून या पत्रामध्ये पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविणे,संघटनात्मक बांधणी बळकट करणे, व लोकसंपर्क वाढविणे या दृष्टीने नवनियुक्त मंडळ अध्यक्षा कडून अपेक्षा व्यक्त केली आहे कळंब तालुक्यातील नव नियुक्त मंडळ अध्यक्षांच्या निवडीचे स्वागत होत आहे.


