राज्यात शिवसेना (शिंदे गट ) युवा संघटन मोठ्या वेगाने बळकट होत आहे - मंत्री सरनाईक
धाराशिव जिह्यातील कळंब तालुका युवासेना संपर्क कार्यालय उद्धाटना नंतर राज्याचे परिवाहन मंत्री तथा थाराशिवचे पालकमंत्री - प्रताप सरनाईक यांची त्यांच्या फेसबुक वरून पोष्ट
देशभक्त न्युज - कळंब प्रतिनिधी / -
१२ जून २०२५ रोजी महाराष्ट्र राज्याचे परिवाहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकताच धाराशिवजिल्हा दौरा केला यावेळी कळंब शहरात शिवसेना संपर्क कार्यालय , कृषि उत्पन्न बाजार समितीत वृक्षारोपण अदि विविध कार्यक्रमाचे मोठे आयोजन शिवसेना पदाधिकारी यांनी केले होते . तालुक्यातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी शहारात शिवसेना तालुका संपर्क कार्यालयाचे जंगी उद्धाटन त्यांच्या शुभहस्ते करण्यात आले आणि त्यानंतर कळंब शहरातच युवासेनेच्या संपर्क कार्यालयाचेही उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले असता सदर कार्यक्रमास युवकांची उपस्थिती व त्यांच्यातील शिवसेना शिंदे गट पक्षा बाबत काम करण्याची तळमळ पाहुन स्वतः मंत्री सरनाईक यांनी आपल्या फेसबुक पोष्टद्वारे असे म्हटले आहे की ,
"राज्यातील युवकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी युवासेनेचे संघटन वेगाने बळकट होत आहे ". याच दृष्टीने आज कळंब येथे युवासेनेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन माझ्या हस्ते संपन्न झाले. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना पुढील कार्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि युवकांसाठी सकारात्मक बदल घडवण्याच्या कार्यात यश मिळो, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यांनी त्यांच्या पोष्ट मध्ये पुढे असेही म्हटले आहे की ,
कृषी उत्पन्न बाजार समितीने आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहिलो. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या स्वागताबद्दल मनःपूर्वक आभार. कार्यक्रमानंतर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत माझ्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
अशी मंत्रीमहोदय सरनाईक यांनी कौतुकास्पद पोष्ट केल्याने कळंब तालुक्यातील शिवसेना तालुका पदाधिकारी , युवा पदाधिकारी आणि शिवसैनिक यांच्यात नवचैतन्य निर्माण झाले आहे .
कळंब तुलाका युवा सेना संपर्क कार्यालय उद्घाटना वेळी मा . आ . ज्ञानराज चौगुले , शिवसेना जिल्हा प्रमुख सुरज महाराज साळुंखे , अजित दादा पिंगळे , कृउबास सभापती शिवाजी आप्पा कापसे , महिला आघाडीच्या भारतीताई गायकवाड , युवा सेनेचे बाजीराव चव्हाण , युवानेते किरण गायकवाड , यांच्यासह युवा सेना तालुका प्रमुख ईश्वर काका शिंदे , गोविंद आवाड , पांडुरंग घोगरे , दिनेश पवार , भास्कर पाढेकर , उपशहर प्रमुख सिद्धार्थ शिंगणापूरे , सिद्धार्थ वाघमारे , सुधाकर महाजन , आण्णासाहेब शिनगारे , प्रशांत हजारे , बंडु तावरे , अनिल यादव , धनजी वगरे , पोपट अंबीरकर यांच्यासह शिवसैनिकांची यावेळी मोठी उपस्थिती होती .
पक्ष नेतृत्वाने तळागाळातील कार्यकर्त्यांच्या कामाची दखल घेणे म्हणजे त्यांना कामकरण्यास उर्जा मिळते
युवासेना तालुकाप्रमुख - ईश्वर (काका ) शिंदे
पक्षीय नेतृत्वाने तळागाळातील जिव तोडून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या कामाची दखल घेवून त्यास केलेल्या कामाची शब्दरूपी पावती दिल्यास तो सर्वश्व झोकून पूर्वी पेक्षा आणखी जोमाने पक्षवाढीच्या कार्यात स्वःला झोकून देवून शेवटच्या घटका पर्यंत पोहंचून त्यांच्या अडीअडचणी सोडवून त्यांना न्याय देण्याचे काम करतो अशी भावना धाराशिव जिल्ह्याचे पालक मंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे परिवाहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कळंब तालुक्यातील कार्यक्रमा संदर्भात त्यांच्या वैयक्तीक फेसबुक अकाऊंन्ट वरून केलेल्या पोष्टवर देशभक्तशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या .



