जुलमी रझाकार आणि आजचे खाकी वर्दीतील गुंडा प्रमाणे शेतकऱ्यांसोबत वर्तन करणारे पोलीस यांच्यात फरक काय ?
राज्याच्ये मुख्यमंत्री तथा गृहमंत्री फडणवीसांना आ . कैलास घाडगे - पाटलांचा सवाल
( संग्रहीत छायाचित्र )
देशभक्त न्युज - वाशी / ( अनिल धावारे )
.........................................................
वाशी तालुक्यातील तांदुळवाडी येथे शेतकऱ्यांना पोलीसांनी केलेल्या अमानूष मारहाणीनंतर धाराशिव - वाशी विधानसभा मतदार संघाचे आमदार कैलास घाडगे - पाटील यांनी सदरील घडलेल्या घटनेबाबत तात्काळ आपल्या फेसबुक वरून व्हिडीओ व पोष्ट करून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना "जुलमी रझाकार आणि आजचे खाकी वर्दीतील गुंडा प्रमाणे शेतकऱ्यांसोबत वर्तन करणारे पोलीस यांच्यात फरक काय " ? असा संतप्त सवाल करून मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यासोबत घडलेल्या प्रकरणी उत्तर देण्याचे आ . पाटील यांनी अवाहन केले आहे .
त्यांनी केलेल्या व्हिडीओ व पोष्टमध्ये असेही म्हटले आहे की , मराठवाड्यात आणि विशेषत : धाराशिव जिल्ह्यात पवनचक्कीचा विषय गंभीर होत आहे . वाशी तालुक्यातील तांदुळवाडी येथील शेतकऱ्यां सोबत घडलेला प्रकार अतीशय गंभीर आणि दुर्दैवी असुन या शिवारात दोन वेगवेगळ्या कंम्पन्या कामे करीत आहेत . ज्या एका दुसऱ्या कंम्पनीने शेतकऱ्यांना अगोदर मावेजा दिला आहे तेवढाचा किमान मावेजा आंम्हालाही मिळावा अशी मागणी तांदुळवाडी येथील गणेश शेरकर यांनी केली मात्र मावेजा ऐवजी कंम्पनी अधिकारी आणि पोलीस प्रशासन , खाजगी सुरक्षा रक्षक यांनी शेतकऱ्यांना त्यांच्याच शेतातील ऊसाने बेदम मारहाण केली असुन या जुलमी मनमानी हुकुमशाहीचा मी जाहिर निषेध करीत असुन पूर्वी रझाकारांच्या जुलमी , मनमानी , हुकमी कार्यपद्धतीपेक्षा वाशी पोलीसांनी शेतकऱ्यांना केलेल्या मारहाणी बाबत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांनी तात्काळ चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे .
पवनचक्की कंम्पनी आणि पोलीस बाबूंनो खबरदार यापुढे शेतकऱ्यांना त्रास घ्याल तर ..... आ . पाटील
देशभक्तने आ . पाटील यांनी केलेल्या फेसबुक व व्हिडीओ पोष्ट बाबत संपर्क साधला असता आ . पाटील म्हणाले की , धाराशिव जिल्ह्यात सध्या पवनचक्कीचे अधिकारी , कर्मचारी , खाजगी सुरक्षा रक्षक यांची खऱ्या अर्थाने पोलीसांच्या जिवावर मुजोरी , दादागिरी वाढत असुन येथील पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी नेमक कोणाचे काम करतात याचाच प्रश्न पडला असुन तांदुळीवाडी येथे पोलीसांनी शेतकऱ्यांवर केलेल्या अमानुष मारहाण ,अन्याय अत्याचारावरून स्पष्ट होत आहे की हे कोणासाठी काम करीत आहेत . मी यापूढील काळात शेतकऱ्यप्रती घडणारे प्रकार कदापी खपवून घेणार नाही असा सज्जड इशारच पाटील यांनी यावेळी बोलताना दिला व घडलेल्या या निंदनीय प्रकाराबाबत मी आवाज उठवून माझ्या शेतकरी राजाला न्याय मिळवून देणार असल्याचे ते म्हणाले .

