सोयाबीन बियाणे उगवले नसल्यामुळे शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीची आ . कैलास घाडगे - पाटील यांनी घेतली दखल
शेतकऱ्या समवेत शेतावर जावून केली पहाणी या प्रश्नीअधिवेशनात उठविणार अवाज .
देशभक्त न्युज - धाराशिव प्रतिनिधी / -
धाराशिव जिल्ह्यात शंभर एकराहून अधिक क्षेत्रावरील सोयाबीन उगवलं नसल्याच्या अनेक तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या होत्या . या तक्रारीच्या अनुषंगाने धाराशिव तालुक्यातील ढोकी,कोल्हेगाव, गोरेवाडी शिवारात अधिकाऱ्यांसोबत धाराशिव - कळंब विधान सभेचे आमदार कैलास घाडगे - पाटील यांनी बांधावर जाऊन शेतात पेरणी केलेले सोयाबीन उकरून त्यांनी यावेळी पाहणी केली.
पेरणी करूनही बियाणे उगवले नसल्याने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देताना आ . घाडगे - पाटील म्हणाले की ,बोगस बियाणांच्या विरोधात प्रलंबित असलेला कायदा पारित करण्यासाठी पाठपुरावा करणार असुन बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान सरकारने कंपन्यांकडून वसूल करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना द्यावे. यासाठी येत्या अधिवेशनात महाविकास आघाडीच्या माध्यमातून आवाज उठविणार असून शेतकऱ्यांना न्याय्य मिळवून देण्यासाठी मी सदैव तुमच्या पाठीशी असल्याचे ते म्हणाले .
