बार्शीत तृतीयपंथी पल्लवी जाधव हीची ' होम मिनिस्टर ' मध्ये बाजी!वॉशिंग मशीन ची ठरली मानकरी
देशभक्त न्युज - बार्शी प्रतिनिधी / -
' पल्लवी तू चल पुढे ,मी आहे ' एवढ्या एकाच वाक्याला मंत्र समजत तृतीयपंथी पल्लवी हिने होम मिनिस्टर मध्ये भाग घेवून चक्क आयोजित केलेल्या कार्यक्रमात दुसरा क्रमांक पटकावत विजय मिळवला. तिला बक्षीस म्हणून वॉशिंग मशीन भेट देण्यात आलं. तृतीय पंथीयाच्या कार्यक्रमातील सहभागाची बार्शीसह सर्वत्रच चर्चा सुरु असुन त्यांचे कौतुकही होत आहे तर कार्यक्रम आजोजित केलेल्या मंडळ समितीचेही तोंडभरून कौतुक करण्यात येत आहे .
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ' होम मिनिस्टर ' कार्यक्रमात पल्लवी आत्मविश्वासने सहभागी झाली. निर्भयपणे तिने अनेक प्रश्नांची हसत खेळत या कार्यक्रमात उत्तरे दिली आणि कोडी सोडविली हे सारे पल्लवीने खंबीरपणे स्वयंस्फूर्तीने केले. विद्यार्थी विकी खलसे, बाबा वाघमारे यांनी जंयती मंडळाकडे आग्रह धरला की या कार्यक्रमात तृतीयपंथी यांनाही सहभागी करून घेण्यात यावे यावरून. शशिकांतभाऊ शिंदे युवा मंच आणि इनरव्हील क्लब याच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात तृतीयपंथी सहभागी झाले होते. त्यांना या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तृतीयपंथी अर्थात पारलींगी समुदायाचा आत्मविश्वास वाढावा यासाठी समितीने मनोभावे प्रयत्न सुरू केले आहेत. याला चांगला प्रतिसाददेखील मिळत असुन याचाच एक भाग म्हणून पल्लवी विजेती ठरली आहे .
आण्णा भाऊ साठे यांचा विचार, चळवळ ज्या वंचितांसाठी सुरू झाली होती, त्याच घटकाला सामावून घेण्याचा मोठेपणा सर्व आण्णा भाऊ साठे विचारक समिती आणि मंडळांनी तसेच तरुणांनी दाखवून या प्रवर्गाला सन्मानाने सामाजिक प्रवाहात आणने खरी काळाची गरज आहे .
