निकष शिथील करून शेतकऱ्यांना शासनाने दिलासा द्यावा - खा राजेनिंबाळकर
देशभक्त न्युज - धाराशिव प्रतिनीधी : -
अतिवृष्टीने ग्रस्त झालेल्या शेती पिकांचे व गावातील घरांचे झालेले नुकसान पहाणी दौरा नुकताच खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केला असून शासनाने सर्व निकष शिथील करुन शेतकऱ्यांना व अतिवृष्टीने नुकसान झालेल्या नागरीकांना दिलासा द्यावा अशी मागणी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली.
ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने आतापर्यंतचे सर्व उच्चांक मोडत काढले असून मोठ्या प्रमाणात शेतीतील काढणी योग्य झालेल्या सोयाबीन, मूग, उडीद यासह अन्य खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच फळ पिकांचे देखील नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील सांगवी, कामेगाव, राजे बोरगाव, बोरखेडा, टाकळी, कनगरा आदी गावांतील शेतकऱ्यांच्या बांधावर जावून शेती पिकांचे पहाणी केली आहे. शासनाने शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करावी व शेतकऱ्यांना आसमानी संकटातून बाहेर येण्यासाठी निकष शिथील करुन मोठ्या प्रमाणात मदत करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केली. तर धाराशिव तालुक्यातील वरील गावातील तेरणा नदीला आलेल्या पुराने नदीकाठचे जमीनीत खरडून जावून पिके संपुर्णत: नष्ट झाली आहे. मोठ्या कष्टाने उभा केलेले पीक पुराच्या पाण्याने वाहून गेल्याने शेतकरी हतबल व निराश झाला असून या परिस्थीतीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी राज्य व केंद्र शासनाकडून भरीव मदतीची आपेक्षा आहे. शेतकऱ्यांना या परिस्थितीत आपण वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांसाठी सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करुन मदत मिळून देण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे त्यांनी सांगितले.
