Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

परंडा तहसील कार्यालय येथे माहिती अधिकार दिन साजरा

अतिवृष्टीच्या संकट काळात सहभागी झालेल्या  सर्वाचे अधिकार दिना निमित्त अभिनंदन कार्यक्रम 

अधिकार संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सत्कार नको अतिवृष्टीत सापडलेल्या नागरिकांची दिवाळी गोड करा अशी भावना

कार्यक्रमात परंडा तालुक्यात अतिवृष्टीग्रस्तांचे तात्काळ करण्याची केली मागणी 

      


     देशभक्त न्युज - परंडा / प्रतिनिधी : - ( फारूक शेख )            

महाराष्ट्रात सर्वत्रच पावसाने हाहाकार उडविला असुन त्याचा फटका मोठ्या प्रमाणात परंडा तालुक्याला बसला असुन दि . 21 सप्टेंबर, 2025 च्या मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे व महापुरामुळे परंडा तालुक्यामध्ये अभुतपूर्व घटना घडून तालुक्यातील लाखी, वडणेर, देवगाव (खु.), ढगपिंपरी, रुई, नालगाव, करंजा, कपिलापुरी व माढा तालुक्यातील मुंगशी या गावांमध्ये अचानकपणे पाण्याच्या प्रवाहामध्ये वाढ होऊन पुरामध्ये अडकलेल्या 328 नागरिकांना गेल्या 03 दिवसांपासून बचाव पथकाच्या सहाय्याने वाचविण्यात आले आहे. त्याकामी मदत करणाऱ्या केंद्रीय आपत्ती प्रतिसाद पथक (NDRF), राज्य आपत्ती प्रतिसाद पथक (SDRF), Indian Army, सर्व संबंधीत महसूल सेवक ते मा. जिल्हाधिकारी महोदय यांच्या पर्यंतची सर्व महसूल यंत्रणा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. /पं. स. विभाग, पोलीस अधिक्षक, पोलीस विभाग, पाटबंधारे विभाग, सिना कोळेगाव प्रकल्प, तालुका कृषी अधिकारी, ग्राम पंचायत अधिकारी / सरपंच, उपसरपंच . ग्राम महसूल अधिकारी, पशूसंवर्धन विभाग, पोलीस पाटील, महसूल सेवक, आरोग्य विभाग कर्मचारी, संबंधीत गावातील तरूण, नागरिक, ग्रामस्थ, नगर परिषद प्रशासन, राजकीय नेते / कार्यकर्ते, सेवाभावी संस्था/संघटना, पत्रकार व इतर यांनी आप-आपले सहकार्य व योगदान देवून आपत्ती काळामध्ये लोकांना वाचविण्यासाठी व धीर देण्यासाठी मदत केली. त्याबददल प्रशासनाच्या वतीने सर्वांचे अभिनंदन करण्यात आले  .

यावेळी नायब तहसीलदार पांडुरंग माडेकर . नायब तहसीलदार श्रीमती गोरे मॅडम , नायब तहसीलदार बारकर यांची प्रमुख उपस्थिती होती .

माहिती अधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष फारुक शेख , प्रचार प्रमुख . नांगरे ,अमित आगरकर , तालुका मुख्यसंपर्क प्रमुख जमीर शिकलकर , शहर कार्यअध्यक्ष शिवाजी पाडूरंग कराळे , परंडा प्रचारक सादिक शेख , सोनारी  किशोर येवारे , नवनाथ कसबे , राहूल बनसोडे , शमशोद्दीन सय्यद ,तानाजी बनसोडे , सोहेल शेख , वहाब बेग , रामा आवाळे ,बळीराम आवाळे , विजय मेहर , मिटू तिपाले इत्यादी यावेळी उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.