Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

धम्म चक्र प्रवर्तन दिना निमित्त कळंब शहरात दोन ऑक्टोबर रोजी भव्य रॅलीचे आयोजन

 धम्म चक्र प्रवर्तन दिना निमित्त कळंब तालुक्यातील व शहरातील धम्म उपासक - उपासिका , बालक - बालीका यांच्या उपस्थितीत निघणार भव्य ऐतिहासिक रॅली .

तालुक्यासह शहरातील धम्म बांधवांना !!आग्रहाचे निमंत्रण!! विजयादश्मी , दसरा या दिनी ..... 🇪🇺🇪🇺

देशभक्त न्युज - कळंब - प्रीतिनिधी / -

दि. 2 ऑक्टोबर 2025 रोजी  धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने कळंब शहरात भव्य दिव्य अशा ऐतिहासिक रॅलीचे आयोजन करण्यात येत असुन शहरातील सर्व तरुण , वयोवृद्ध मंडळींनी या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी झोकून दिले असुन संपन्न होणारा कार्यक्रम आकर्षक करण्यासाठी धम्मबांधव कामाला लागले आहेत . २ आक्टोबर रोजी संपन्न होणारी रॅली ठिक सकाळी 11:00 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा येथून सर्व धम्म बांधवांच्या उपस्थितीत निघणार असुन या सदरील रॅली प्रमुख होळकर चौक , कथले चौक ,भीमनगर ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ,आठवडी बाजार रोड ,ढोकी रोड , छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गे प्रमुख रस्त्यावरून मार्गक्रमण करून  शेवटी पुन्हा होळकर चौक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी या  ऐतिहासिक रॅलीलीचा समारोप होणार असुन उपस्थित धम्म बांधवांसाठी डॉ . बाबासाहेब आंबेडकर स्मारक पुतळ्यासमोर भव्य अन्नदान आयोजित करण्यात येणार आहे . 

तरी या ऐतिहासिक रॅलीमध्ये सर्व धम्म बांधव, बालक-बलिका, ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरुष, तरुण-तरुणी यांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचे अवाहन आयोजक मंडळींच्या वतीने करण्यात आले आहे .

चला तर मग ......

बाबासाहेबांच्या विचारांची ज्योत तेवत ठेवूया आणि

ही रॅली एक भव्य, दिव्य आणि ऐतिहासिक कार्य बनवूया . . .. .!



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.