निपाणी येथील शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप सार्वजनिक कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक
देशभक्त - नुज - भूम प्रतिनिधी (कुणाल लगाडे) / -
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा निपाणी, येथील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक वातावरण निर्मिती व्हावे आणि गुणवत्ता वाढावे शिष्यवृत्ती नवोदय विद्यार्थी धारक व्हावेत यासाठी आपण दररोज सकाळी नऊ ते दहा एक्सट्रा क्लास घेत असतो. या निमित्त पहिले शिष्यवृत्ती सराव चाचणी परीक्षा घेतली होती त्यासाठी प्रथम बक्षीस एक स्कूल बॅग दुसरे बक्षीस एक कंपास पेटी आणि तिसरे बक्षीस परीक्षा पॅड आणि परीक्षेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना एक दोनशे पेजेस रजिस्टर वही हे आपल्या गावचे कर्तव्यदक्ष नागरिक श्री अविनाश अनभुले यांच्यामार्फत देण्यात आले. या कार्यक्रमाला अजिंक्य अनभुले, ईश्वर आलाट, रघुनाथ घोडके सोमनाथ कोकाटे शाळेतील ज्येष्ठ शिक्षका श्रीमती देशमुख मॅडम, कसबे सर कुलकर्णी सर इत्यादी शिक्षक उपस्थित राहून विद्यार्थ्याला प्रोत्साहन देऊन त्यांचे मनोबल करण्यात आले.वरील नागरिकांचे शाळेतर्फे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.
