भूम नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी 9 अर्ज दाखल तर दहा प्रभागांमध्ये 84 जणनी आपले अर्ज दाखल केले.
देशभक्त - न्युज भूम प्रतिनिधी / - (कुणाल लगाडे)
नगरपरिषद निवडणूकांचे सर्वत्र बिगूल वाजले असून यात भूम नगरपरिषद निवडणूकीसाठीही अर्ज उमेदवारांनी मोठ्या संख्येनी दाखल केले आहेत . येथील ग्रामदैवत आलमप्रभूच्या आशीर्वादाने शहरातील मतदार बंधू भगिनींच्या साक्षीनं आज आलमप्रभू भूम शहर विकास आघाडीच्या वतीने भूम नगराध्यक्ष पदासाठी सौ . संयोगिताताई संजय गाढवे यांचा उमेदवारीअर्ज दाखल करण्यात आला .यावेळी आपले मार्गदर्शक माजी मंत्री आमदार डॉ. प्रा. तानाजी सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.
तर आई तुळजाभवानी आणि श्री आलमप्रभू च्या आशीर्वादाने जनतेच्या मनातील नगराध्यक्षा सौ. सत्वशीला धनाजीराव थोरात यांनी जनशक्ती नगर विकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारीचा अर्ज सुजितसिंह ठाकूर राहुल मोटे यांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आला
भूम नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी आलमप्रभू शहर विकास आघाडी कडून सौ. संयोगिता संजय गाढवे यांचा उमेदवारी अर्ज भरताना आमदार प्रा . डॉ . तानाजीराव सावंत, माजी नगराध्यक्ष संजय गाढवे, जिल्हाप्रमुख दत्ताआण्णा साळुंखे, बालाजी गुंजाळ सह पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान भूम शहरातून मोठ्या प्रमाणात बाईक रॅली काढत, आलमप्रभू देवस्थानचे दर्शन घेत प्रचंड शक्ती प्रदर्शनाने सौ. संयोगिता संजय गाढवे यांच्या सह नगरसेवक उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.
भूम नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिलासाठी असल्याने यामध्ये सौ.संयोगिताताई गाढवे, सत्वशीला थोरात, दैवशाला साबळे, प्रगती गाढवे, ॲड. अमृता गाढवे, ज्योती पोळ, प्राजक्ता शिंदे, मीरा मस्कर यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

