Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

परंडा नगरपरिषदेत अर्ज छानननी वेळी अक्षेपावरून मोठा राजकीय राडा

 परंडा नगरपरिषदेत अर्ज छानननी वेळी अक्षेपावरून मोठा राजकीय राडा

 मोटे आणि सावंत गटातील वादाचा वनवा तुफान दगडफेकीत रूपांतर 


देशभक्त न्युज - परंडा फारूख शेख  प्रतिनिधी / -

परंडा नगरपरिषद निवडणूक छाननी वेळी माजी मंत्री तथा आ . तानाजी सावंत विरुद्ध मा . आ . राहूल मोटे इतर सर्व पक्षघटक आघाडी यांचे कार्यकर्त्यांत अर्ज छाननी वेळी एकमेकावरील अक्षेपावेळी बाचाबाची झाल्याने त्याचे पर्यावसन दोन्ही गट आमने - सामने येवून चक्क सिनेस्टाईल तुफान एकमेकावर दगड फेकीच्या राड्याने झाले .   

 परंडा - भूम नगर परिषदेच्या निवडणुकीचा आखाडा धाराशिव जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत असुन या ठिकाणी सावंत विरुद्ध सर्वपक्षीय नेतेमंडळी अशी चुरस निर्माण झाली असुन सध्या येथील राजकीय वातावरण आज चांगलेच तापल्याचे झालेल्या मोटे आणि सावंत गटातील दगडफेकीने पाहायला मिळाले. परंडा नगरपरिषदेसाठी दाखल करण्यात आलेल्या नामनिर्देशन अर्जावरील आक्षेपाच्या कारणावरून मंत्री प्रा . डॉ .तानाजी सावंत आणि माजी आमदार राहुल मोटे यांचे गट आमनेसामने आले. यावेळी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादी होऊन त्याचे रूपांतर दगडफेकीच्या राड्याने झाले.

याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार परंडा नगर पंचायतीच्या निवडणूकीचा सामना थेट शिंदे गट आणि सर्वपक्षीय स्थानिक विकास आघाडी गट यांच्यात रंगणार असुन या निवडणूक रिंगणाच्या सामन्यासाठी उतरलेल्या उमेदवारांच्या अर्ज छाननीचा आज १८ नोव्हेंबर हा दिवस असल्याने सर्वच अर्ज भरलेले उमेदवार या वेळी उपस्थित होते . दरम्यान अर्जाची छाननी प्रक्रीया सुरु असताना प्रा . डॉ .तानाजी सावंत गटाचे उमेदवार झाकीर सौदागर आणि माजी आमदार राहुल मोटे यांच्या गटाचे उमेदवार विश्वजित पाटील यांच्यात सुरुवातीला अर्जावर आक्षेप घेण्यावरून शाब्दिक चकमक झाली आणि शिवसेना शिंदे गट व सर्वपक्षीय स्थानिक विकास आघाडीचे कार्यकर्ते परस्परांना भिडले आणि या

वादाचे पर्यावसान लवकरच मोठ्या गोंधळात झाले. दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याने परिस्थिती चिघळली आणि दोन्ही गटांकडून दगडफेक करण्यात आली. या घटनेमुळे परंडा नगरपरिषद परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे. वेळीच परंडा पोलीसांनी धाव घेवून परस्थिती नियंत्रणात आणली .

वादाच्या घटनेलला कारणीभूत ठरलेल्या घडमोडी  : -

अर्ज छाननी वेळी निवडणूक अर्जावर आक्षेप घेतल्याने घडली घटना आ . प्रा . डॉ .तानाजी सावंत आणि मा . आ . राहुल मोटे यांचे समर्थक आमनेसामने.

उमेदवार झाकीर सौदागर आणि विश्वजित पाटील यांच्यात बाचाबाची  .

घडलेल्या शाब्दिक चकमकीनंतर दगडफेकीची धुमचक्री , परिसरात मात्र तणावाचे वातवरण .

परंडा पोलीसांनी विलंब न लावता धाव घेवून परस्थिती नियंत्रणात आणली .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.