पिढ्यान् पिढ्या बंद असलेला शेतरस्ता अतिक्रमण मुक्त
कळंबचे तहसिलदार हेमंत ढोकले यांनी बांधावर जाऊन मिटविला प्रश्न त्यांच्या या कर्तव्य तत्पर कामामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदण होत आहे .
देशभक्त न्यूज - कळंब प्रतिनिधी / -
सरकारने शेतरस्त्या बाबत कडक निर्णय जाहिर केले असुन कांह अपवादात्मक शेतकरी निष्कारण शेतरस्ता अडविणे , केलेला रस्ता उकरणे , असे चुकीचे वर्तन करीत असलेल्या बहादराहो आता सावधान कळंब तहसिलचे तहासिलदार आपल्या कर्मच्या ऱ्यांच्या तगड्या टिमसह पोलीस प्रशासनासह अशा वादग्रस्त बांधावर प्रत्यक्ष हजर राहून सदरील शेतरस्ते मोकळे करून देण्यासाठी मैदानात उतरले आहेत .
याच कर्तव्याचा भाग म्हणून तालुक्यातील मौ. लोहटा (प) येथील जमीन ग.नं.239 ते 249 असणारा गाव नकाशावरील रस्ता अतिक्रमण मुक्त करण्यात आला असल्याने कळंबचे तहसीलदार आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून अल्पावधितच आपल्या प्रशासन स्तरावरील काम करण्याच्या शैलीने तालुक्यात ओळख निर्माण करणारे हेमंत ढोकले यांनी तालुक्यातील शेतरस्त्याचे प्रश्न प्रत्यक्ष बांधावर जाऊन सोडवले आहेत. त्यांच्या या काम करण्याच्या पद्धतीमुळे तालुक्यातील शेतकरी वर्गात त्यांचे विशेष कौतुक आहे.
याबाबत सविस्तर बातमी अशी की , तालुक्यातील पिढ्यान् पिढ्या चालत आलेले शेतरस्त्याचे वाद मिटवण्यासाठी प्रशासन सध्या ॲक्शन मोडवर असुन ते याकामी ठोस पावले उचलत आहेत. तहसीलदार हेमंत ढोकले यांच्या देखरेखीखाली अशा या शेतरस्त्याचे अतिक्रमण हटविण्यात येत आहे . तालुक्यातील लोहटा पश्चिम येथील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय, कळंब येथे शेतरस्त्याची मागणी केली होती.
अतिक्रमित असलेला रस्ता स्वतः तहसीलदार यांनी घटनास्थळी जाऊन स्थळ पाहणी केली. शेतकऱ्यांना असणारी अडचण जाणून घेतली आणि पंचनामा केला.या प्रकरणी वेळोवेळी तहसील कार्यालय, कळंब येथे शेतरस्त्याची कार्यालयीन सुनावणी घेण्यात आली.
शेतकऱ्यांचे मत ऐकून त्यानंतर यासंदर्भात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 50 अंतर्गत आदेश पारित झाला. या आदेशांचे पालन करून दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी प्रशासनाने रस्ता खुला करून दिला.
शेतीचा आत्मा म्हणजे शेतरस्ता
अनेक वर्षांपासून बंद असलेला शेतरस्ता अतिक्रमण मुक्त झाला आहे त्यामुळे लोहटा पश्चिम गावातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.प्रशासनाच्या देखरेखीखाली कायदा व सुव्यवस्था राखुन या शेतरस्त्याचे अतिक्रमण हटविण्यात आले.
लोहटा पश्चिम मधील गट क्रमांक 239 ते गट क्रमांक 249 पर्यंत असणारा गाव नकाशावरील रस्ता अतिक्रमण मुक्त करण्यासाठी तहसीलदार हेमंत ढोकले , मंडळ अधिकारी सुतार ,तलाठी शिंदे ,पोलिस प्रशासन , महसुल कर्मचारी तसेच संबंधित शेतकरी यावेळी उपस्थित होते.



