Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र कृषिदिन कोल्हारवाडी गावात विविध कार्यक्रमांनी साजरा

 महाराष्ट्र कृषिदिन कोल्हारवाडी गावात विविध कार्यक्रमांनी साजरा  

आदित्य कृषि महाविद्यालयाच्या कृषिदूतांकडून वृक्षारोपण , वृक्ष जनजागृती ,शालेय विद्यार्थ्यांना वही , पेन , खाऊ , वृक्ष दिंडी आदि स्तुत्य उपक्रम  

                   देशभक्त न्युज -  बीड प्रतिनिधी / -

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी संलग्नित व आदित्य शिक्षण संस्था, बीड संचलित आदित्य कृषि महाविद्यालयाचे यांच्या मार्गदर्शनाखाली " महाराष्ट्र कृषि दिनाचे " औचित्य साधून बीड जिल्हा व तालुक्यामधील कोल्हारवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत व आंगणवाडी परिसरात विविध वृक्षांचे वृक्षारोपण मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले .ग्रामीण कृषि कार्यानुभव आणि कृषि औद्योगिक संलग्नता उपक्रम २०२६-२०२७ नुसार हो उपक्रम राबविण्यात येत आहेत .


बुधवार दि.०१ जुलै रोजी सकाळी ठिक ९.०० वाजता गावातील प्रमुख रस्त्यावरून शालेय विद्यार्थी यांच्या सह वृक्ष दिंडी काढून " वृक्ष वल्ली आंम्हा सोयरे ", झाडे लावा , झाडे जगवा , एक व्यक्ती एक झाड आदि जयघोषात कृषि दिनाची जनजागृती करण्यात आली .


आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला डॉ. आदितीजी सुभाषचंद्रजी सारडा संचालक, आदित्य शिक्षण संस्था, बीड ,श्रीमती विद्या रमेश भोसले सरपंच ,श्रीमती मनिषा अशोक शिंघन उपसरपंच , शैलेश गांधले ग्रामविकास अधिकारी , श्रीमती ख्रिस्ती एफ. आर मुख्याध्यापक जि.प.प्रा. शाळा यांची प्रमुख उपस्थिती तर या कार्यक्रमास मार्गदर्शक म्हणून प्रा. श्याम भुतडा प्राचार्य, आदित्य कृषि महाविद्यालय हे होते . कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व कृषिदूताना डॉ. ब्रम्हदेव मुंडे कार्यक्रम समन्वयक , डॉ. धनंजय सातपुते कार्यक्रम अधिकारी ,डॉ. श्रध्दा एडके ,ग्राम सहवास अधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले .

 तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषिदूत वाघ प्रमोद, गारुळे सार्थक, आव्हाड अतुल, पवार माऊली, सिरसाट संतोष, शिंदे रोहन, मुसळे विजय, चौधरी श्याम, राठोड युवराज यांनी मोठे परिश्रम घेतले . कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय, कोल्हारवाडी चे सहकार्य लाभले .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.