Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

बजरंगाच्या आंदोलनाची कमाल अन् प्रशासनाची उडाली दाणादाण

 बजरंगाच्या आंदोलनाची कमाल अन् प्रशासनाची उडाली दाणादाण

कळंब तालुक्यातील ग्रामपंचायतने मुख्यमंत्री समृद्ध योजने अंतर्गत घरपट्टी , नळपट्टी इतर करांच्या केलेल्या वसुलीचा मानवी हक्क अभियान आणि श्रमिक मानवाधिकार संघाने वसुल निधी खर्चाची मागितली माहिती 

प्रशासन स्तरावरून माहिती देण्यास कागदी घोडे नाचवून टाळाटाळ कॉ . बजरंग ताटे यांच्या नेतृत्वाखाली अर्धनग्न आंदोलन 

लहूजी शक्ती सेना या आंदोलनास पाठिंबा देत उतरली मैदानात 

         देशभक्त - न्युज / कळंब प्रतिनिधी -

मुख्यमंत्री समृद्ध योजने अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर प्रसिद्धी करून मुळ घरपट्टीच्या निम्मी छरपट्टी भरून ग्रामपंचायत करमुक्त बेबाकी व्हा आणि चालू वर्षातील ग्राप . करात येवून शासकीय योजनांचा लाभ घ्या नाहीतर योजनांचा लाभ मिळणार नाही असेही ग्राप कर्मचारी यांच्या माध्यमातून सांगण्यात येत होते .

अर्धी करमुक्ती मिळतेय म्हणून नागरीकांनी मोठी गर्दी करून मागिल कराच्या रक्कम व्याजासह ग्रापचे आपआपले आठ 'अ 'बेबाकी करून घेतले हा गोळा करण्यात आलेल्या निधी खर्चाची संबंधिक ग्रामअधिकारी व संबंधिक प्रशासक मंडळींनी कशी विल्हेवाट लावली याबाबतची माहिती प्रशासन स्तरावर  मानवी हक्क अभियानचे संस्थापक अध्यक्ष कॉम्रेड बजरंग ताटे  आणि श्रमिक मानवाधिकार संघाच्या जिल्हाध्यक्ष माया शिंदे यांनी कळंब पंचायत समितीकडे माहिती अधिकार , निवेदनाद्वारे केली असता प्रशासन स्तरावरून त्यांना कार्यालयीन पत्राचे कागदी घोडे नाचवून वेळ काढण्याचे काम सुरू असल्याने भाई ताटे यांनी सदर प्रकरणी लवकरात लवकर महिती मिळवी यासाठी तालुक्यातील नागरिकांना सोबत घेवून गनिमी काव्याने अधिकाऱ्यांच्या गाड्यांच्या पुढे रस्त्यावर झोपून , अर्धनग्न अंदोलन करून त्यांच्या आंदोलनाची सर्वत्र हवाच केली आहे .

या आंदोलनात लहूजी शक्ती सेनेचे महाराष्ट्र सचिव बालजी गायकवाड यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह उडी घेतल्याने प्रशासन स्तरावरून मागण्या मान्य न झाल्यास या आंदोलनाची धग पुढील काळात आक्रमक होणार असल्याची चर्चा होत आहे .

         आंदोलनातील प्रमुख मागण्या  : -

 ग्रामपंचायत स्तरावरील वसुल निधी लोकसंख्या निहाय कोठे - कोठे  खर्च करण्यात आला त्याबाबत माहिती , दलित-आदिवासी-बहुजन समाजाची गायरान जमीन व निवासी अतिक्रमणे नावावर करण्यात यावीत आदि मागण्यांसाठी आंदलना पूर्वीच प्रशासन स्तरावर निवेदन देण्यात आली आहेत .


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.