आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली २८ जुलैला धाराशिवात विशाल मोर्चाचे आयोजन
कळंब तालुक्यातून दहा हजार नागरिक सहभागी होणार
बैठकांचा धडाका तर नागरिकांचा मोर्चात मोठ्या संख्यनी सहभागी होण्याचा निर्धार
देशभक्त - न्युज / कळंब प्रतिनिधी
अनुसूचित जातींच्या प्रस्तावित वर्गीकरणाविरोधात दिनांक २८ जुलै २०२६ रोजी धाराशिव येथे विशाल मोर्चा काढण्यात येणार असून, या मोर्चाचे नेतृत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तथा रिपब्लिकन सरसेनानी आनंदराज आंबेडकर करणार आहेत.
या मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी कळंब येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात बैठक घेण्यात आली. यावेळी कळंब तालुक्यातून दहा हजार नागरिक मोर्चात सहभागी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
हा मोर्चा महाराष्ट्रातील अनुसूचित जातींमधील ५९ जातींच्या एकतेचा, समतेचा आणि सामाजिक न्यायाचा एल्गार असणार आहे. समाजात फूट पाडणारे वर्गीकरण कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नाही, अशी ठाम भूमिका बैठकीत मांडण्यात आली.
शासनाने जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण करणारी मानसिकता सोडून संविधानातील समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाची भूमिका स्वीकारावी. अन्यथा राज्यात गंभीर सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असा इशाराही देण्यात आला.
कळंब तालुक्यातील नागरिकांनी २८ जुलै रोजी मोठ्या संख्येने धाराशिव येथे उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.या बैठकीला प्रा . डॉ .संजय कांबळे , प्रा . डॉ .एस . एम . कांबळे , डॉ .सुनील गायकवाड ,अनिल हजारे ,सतपाल बनसोडे , किशोर वाघमारे , अमर गायकवाड ,राहूल हौसलमल, राजाभाऊ गायकवाड , मुकेश गायकवाड , सचिन तिरकर ,एल . आर . धावारे, सुरेंद्र शिलवंत ,तात्यासाहेब वाघमारे ,हजारे अरविंद , गाडे , सावंत सदानंद ,डाके नीतीन व इतर अनेक कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येनी उपस्थित होते .
