Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे संरक्षण आणि आरक्षणाच्या उपवर्गीकरणास विरोध यासाठी लाखों जनसमुदायाच्या उपस्थितीत भव्य संविधान बचाव मोर्चाचे आयोजन

 अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे संरक्षण आणि आरक्षणाच्या उपवर्गीकरणास विरोध यासाठी लाखों जनसमुदायाच्या उपस्थितीत भव्य संविधान बचाव मोर्चाचे आयोजन  

आनंदराज आंबेडकरांची मोर्चास प्रमुख उपस्थिती 

आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीचा धाराशिव जिल्ह्यात बैठकांचा सपाटा  

         देशभक्त  न्युज  - धाराशिव प्रतिनिधी / -

आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समिती, जिल्हा धाराशिव यांच्या पुढाकारातून दि . २८ जुलै २०२६ वार मंगळवार रोजी दुपारी १.०० वाजता भारतीय संविधानाचे संरक्षण, सामाजिक न्यायाचे रक्षण, अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे संरक्षण आणि आरक्षणाच्या उपवर्गीकरणास विरोध करण्यासाठी हा भव्य संविधान बचाव मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.

संविधानिक हक्क अबाधित ठेवण्यासाठी आणि सामाजिक न्यायाच्या रक्षणासाठी संपूर्ण धाराशिव जिल्हा या मोर्चात सहभागी होवून एकवटणार आहे.

या भव्य दिव्य अशा मोर्चात प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर , त्यांच्या सोबत बबनराव घोलप ,रुक्मिणीताई लोंढे ,सिद्धार्थ शिनगारे ,राजू थाटे तसेच विविध सामाजिक, राजकीय आणि आंबेडकरी चळवळीतील मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

धाराशिव जिल्ह्यातील सर्व तालुके, गावे आणि वाड्या-वस्त्यांमधून एक लाखाच्या जवळपास संविधानप्रेमी नागरिकांचा जनसागर या मोर्चात सहभागी होणार असल्याचा आयोजकांचा विश्वास आहे.

या मोर्चामध्ये अनुसूचित जातीतील ५९ जातींचे सर्व प्रतिनिधी ,कर्मचारी संघटना ,मागासवर्गीय कर्मचारी संघटना ,वकील संघटना ,डॉक्टर संघटना ,अभियंता (इंजिनिअर) संघटना ,शिक्षक व प्राध्यापक संघटना ,युवक व विद्यार्थी संघटना ,महिला संघटना ,सामाजिक व आंबेडकरी संघटना ,विविध कामगार संघटना ,संविधानप्रेमी नागरिक सर्वजन सहभागी होणार असल्याची माहिती आयोजक समिती कडून देण्यात आली आहे .

मोर्चा यशस्वीतेसाठी जिल्हा समन्वय समिती : -

राजाभाऊ ओव्हाळ,धनंजय (नाना) शिंगाडे ,कैलास शिंदे ,संजयकुमार बनसोडे ,राजाभाऊ राऊत ,अनिल हजारे ,तसेच सर्व तालुका समन्वयक, पदाधिकारी आणि स्वयंसेवक मोठे परिश्रम घेत आहेत.

विविध समित्या गठित : -

नियोजन आणि शांततामय मोर्चासाठी विविध समित्या गठित करण्यात आल्या असुन यामध्ये  स्टेज समिती ,स्वागत समिती ,शिस्त व सुरक्षा समिती ,देखरेख समिती ,स्वच्छता समिती ,वाहतूक व्यवस्थापन समिती ,पाणी व्यवस्था समिती ,वैद्यकीय मदत समिती ,प्रसिद्धी समिती ,बॅनर व पोस्टर समिती ,ध्वनी व्यवस्था समिती ,स्वयंसेवक समिती ,महिला समिती ,भोजन व्यवस्था समिती ,निवेदन समिती यांचा सामावेश आहे .

मोर्चा या मार्गाने निघणार : -

मोर्चा जिजाऊ चौक येथून प्रारंभ होऊन संभाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार त्यानंतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य जाहीर सभा होईल व शासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात येणार आहे 

 आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती आयोजक समिती कडून अहवान :-

धाराशिव जिल्ह्यातील अनुसूचित जातीतील सर्व ५९ जातींचे प्रतिनिधी, सर्व कर्मचारी संघटना, मागासवर्गीय कर्मचारी संघटना, वकील, डॉक्टर, अभियंते, शिक्षक, विद्यार्थी, महिला, युवक, शेतकरी, कामगार, सामाजिक संघटना आणि सर्व संविधानप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संविधान, सामाजिक न्याय आणि आरक्षणाच्या संरक्षणासाठी आयोजित या ऐतिहासिक मोर्चाला यशस्वी करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.