महापुरुष , साधू संत यांच्या विचार धारेवर इथे रुजविला जातोय सर्व धर्म समभाव ....!
आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल .... विठ्ठल .... नामाच्या गजरात वारकारी दिंडी आणि जिप . शाळेतील विविध वेषभूषा धारक चिमूकल्यांनी भिमनगरात प्रस्थान करून तथागत गौतम बुद्धांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून टाळ , मृदंगाचा धरला ठेका
समाज बांधवांनी सर्व वारकरी बांधवांना आषाढीच्या दिल्या शुभेच्छा ....!
देशभक्त न्यूज - ईटकुर प्रतिनिधी / -
धाराशिव जिल्हा त्यातील कळंब तालुक्यातील ईटकुर हे गाव सैदव सामाजिक , राजकीय , शैक्षणिक दृष्ट्या चर्चेत असते त्याचाच प्रत्यय म्हणजे आज " आषाढी एकादशी " सर्वत्र मोठ्या उत्साही वातावरणात साजरी होत असताना येथे प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी मोठ्या भक्ती भावाने आपल्या लाडक्या विठ्ठाराचे नामस्मरण व गावास दिंडी प्रदक्षिणेचे आयोजन करण्यात आले होते .
वारकरी सांप्रदायातील मंडळींची दिंडी विठ्ठल ...... विठ्ठल नामाचा टाळ , मृदंग गजरात विठ्ठल रुक्मिणी मंदिरा पासुन निघाली ती गावातील प्रमुख रस्त्यावरून भिमनगर मार्गे प्रस्थान करीत असताना येथील बुद्ध विहारा समोर " जगाला शांततेचा संदेश देणारे , महाकारूणी तथागत गौतम बुद्ध " यांच्या प्रतिमेस वारकरी मंडळींनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले व महापुरुष , साधू संत यांच्या विचार धारेवर इथे रुजविला जातोय सर्व धर्म समभाव ....! या विचारांना मोठा उजाळा दिला .
यावेळी सेवानिवृत्त माजी आदर्श शिक्षक तुकाराम शिंदे यांनी साधू संताचे विचार आणि तथाग गौतम बद्धांच्या विचार प्रणालीचे साम्य व्यक्त केले तर देशभक्त चे संपादक लक्ष्मण शिंदे - पाटील यांनी या स्तुत्य कार्यक्रमाचे अभिनंदण करून वारकरी पुरुष , महिला मंडळींना आषाढी एकादशिच्या शुभेच्छा देवून त्यांचे स्वागत केले .
यावेळी ॲड . सतिषकुमार रणदिवे , सामाजिक कार्यकर्ते सचिन गंभिरे , अभयसिंह आडसुळ , मुकुंद शिंदे , मिलींद रणदिवे , अनुज लगाडे यांच्यासह समाजातील तरुण भिमसैनिक , उपासक , उपासिका यांची प्रमुख उपस्थिती होती .
दिंडीच्या प्रस्थानानंतर जिल्हा परिषद प्रशाला ईटकूर येथील विविध वेशभूषातील मुला - मुलींची शालेय दिंडी या मार्गावरून येत असताना त्यांनीही " महाकारूणी तथागत गौतम बुद्ध " यांच्या प्रतिमेस मेणबत्ती प्रज्वलीत करून धूप व पुष्प वाहून अभिवादन केले . या शालेय दिंडीत मुख्याध्यापक गणेश कोठावळे , सहशिक्षक संजय तांबारे , काकासाहेब गावखरे , अनिल शिंदे , राहूल बाबर , सय्यद एम . एस . व इतर शिक्षक वृंदांनी यात सहभाग नोंदवला होता .तर यावेळी गावकरी , तरुण मंडळी यात सहभागी झाले होते .
जिल्हा परिषद प्रशालेतील मुला - मुलींनी विठ्ठल रुक्मिणी यांच्या साकारलेल्या वेषभूषा आणि साधू संतांच्या वेषभूषा , पांढऱ्या वेशातील विद्यार्थ्यांची वारकरी भूमिका अगदी सर्व गावकऱ्यांची आकर्षक ठरली या स्तुत्य उपक्रमाचे गावकऱ्यांतुन कौतुक होत असुन शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कलेल्या शिक्षवृंदांवर आणि शालेय व्यवस्थापन समितीवर अभिनंदनाचा वर्षाव गावकरी मंडळी व पालक वर्ग यांच्यातुन होत आहे .


