Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पाऊस पडेना , कर्जमाफीचे बॅकेत विशिष्ट नंबर येईना , केवायसी होईना शेतकऱ्यांचा जिव कात्रीत

पाऊस पडेना , कर्जमाफीचे बॅकेत विशिष्ट नंबर येईना , केवायसी होईना शेतकऱ्यांचा जिव कात्रीत 

पावसाअभावी पिकांनी माना टाकल्या तर कर्जमाफी बाबत बँकेचे उंबरे झिजवून शेतकरी दुहेरी संकटात 

बँक मॅनेजर म्हणतात केवायसी करा , ऑनलाईनवाला म्हणतो यादीतील विशिष्ट नंबर आणा

सध्या पाऊस कुठे पडतो तर कुठे नाही यामुळे या लहरी निसर्गाच्या आगमनाने बऱ्याच ठिकाणी कंही खुशी कंही गम अशीच परिस्थिती .

महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने तान्ह्या पिकाने माना टाकल्या आहेत .

पाऊस पडत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला असुन याचा परिणाम उत्पन्नावर होणार असल्याने अगामीकाळात शेतकरी आर्थिक संकटात जाणार याची स्पष्ट चिन्हे .

महाराष्ट्रातील महयुती सरकारने मोठा गाजावाजा करून शेतकरी कर्जमाफी योजना केली खरी परंतु अनेक बँकात याद्या आल्या परंतु त्यास विशिष्ट नंबर आले नसल्याने बँकांची कारवाई ठप्प .

कर्जदार शेतकरी बँकांत हेलपाटे मारून बँकांचे उंबरे झिजवून परेशान बँकांचे स्पष्टीकरण आंम्हास यादी प्राप्त झाली असुन विशिष्ट नंबर आले नाहीत .

कर्जमाफी साठी बँका सांगतात केवायसी करा , ऑनलाईन सेंटरवर आधारकार्ड घेवून गेल्यास कर्जमाफी संदर्भात  विशिष्ट नंबर समाविष्ट करण्यास ऑनलाईन सिस्टम वर माहिती त्यामुळे केवायसी होईना .

पाऊस पडत नसल्याने आणि कर्जमाफी संदर्भात केवायसी होत नसल्याने शेतकरी पुरता मेटाकुटीला अला असुन सरकारच्या धोरणावर नाराज होत आहे .

 महाराष्ट्रात सध्या पडलेल्या पावसाचा व ज्या ठिकाणी पाऊस पडला नाही तेथील शेतकऱ्यांची परिस्थिती म्हणजे " कंही खुशी , कंही गम " अशीच पहायला आजतरी मिळत आहे .

पाऊस पडेना , तान्ह्या पिकांनी माना टाकल्या , कर्जमाफीचे बॅकेत विशिष्ट नंबर येईनात , त्यामुळे केवायसी होईना या अशा दोन्ही प्रश्नांच्या कात्रीत शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला असल्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातवरण निर्माण झाल्याची वास्तव परिस्थिती निर्माण झाली आहे .

मग अशा गंभीर प्रश्नाची रोख - ठोक चर्चा तर होणारच ....!


 येरे .... येरे पावसा , तुला देतो पैसा या बाल काव्य पंक्तीची आठवण सध्या समोर येत आहे कारण पाऊस पडत नसल्याने सोयाबीन , उडिद  ,मुग आदि खरीपातील पिके नपडणारा पाऊस आणि कडक उन्हाचा सामना करीत चक्क माना खाली टाकात आहेत तसं पिकाकडे पाहिलं की मनात येणाऱ्या उत्पन्नावर आर्थिक उलाढालीचे स्वप्न पहानारा शेतकरी आपले स्वप्न भंग होतान पहात असताना मनोमन होरपळत आहे .

एकीकडे नपडणाऱ्या पावसामुळे पिके धोक्यात चालली असुन दुसरीकडे पेरणी पूर्व मशागती पासून केलेला अव्वा च्या सव्वा खर्च त्यामुळे डोक्यावर घेतलेला कर्जाचा डोंगर या उद्‌भवलेल्या नैसर्गिक संकटामुळे येथील शेतकरी पुरता मेटाकुटीला आल्याचे वास्तव चित्र पहावयास मिळत आहे .  

कृषी बाजार पेठेतील आर्थिक कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांची नैसर्गिक लहरी पणा , वाढलेले बि - बियाणे , खते , औषधे यांचे भाव पुढे पिकवलेल्या शेतमालाला बाजार पेठेत योग्य भाव न मिळणे या व आदि कारणामुळे शेतकरी वर्गाचे योजलीले गणीत पूरते कलमडले जात असल्याने परिणामी बँकांच्या कर्जाकडे अपसूकच आधार म्हणून शेतकऱ्यांची पाऊले जातात .

बँकाकडून पिककर्ज घेवून डोक्यावरील खाजगी ,कर्ज स्वरूपाचे , उसणवारीआर्थिक देवाण घेवाणीचे व्यवहार पार पाडले जातात .

येणाऱ्या पिकावर बँकांचे घेतलेले कर्ज फेडु या स्वप्नांच्या विचारात जगणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र पुढे निसर्गाच्या लहरी प्रसंगान सामोरे जावे लागते आणि मग पाऊस न पडल्याने बिच्याऱ्या शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पूरते पाणी फिरते आणि आणि बँकेच्या कर्जाचा बोजा तसाच डोक्यावर ....

मग निवडणूक काळात केलेल्या घोषणाच्या पावसात "कर्जमाफी " या शब्दाचे बिच्याऱ्या शेतकऱ्यांना पाठबळ मिळते आणि आता आपली कर्जमाफी होणार या आर्थिक मदतीच्या पाठबळावर तो ताठ कण्याने उभा राहातो व सरकारने केलेल्या " शेतकरी कर्ज माफी " संदर्भात बँकाचे हेलपाटे सुरू करतो परंतु तिथेही शासनाच्या लाल फितीतील नियम व अटींच्या शर्यतीत तो पुरता मेटाकुटील येत असल्याचे वास्तव चित्र आहे .

सरकारने केलेल्या कर्जमाफीच्या याच्या बऱ्याच बँकात आल्या त्यावर कामकाज सुरू झाले परंतु कांही बँकात कर्जमाफी याद्या आल्या त्याला विशिष्ट नंबर नाहीत . बँक मॅनेजर म्हणतात केवायसी करा , ऑनलाईनवाला म्हणतो यादीतील विशिष्ट नंबर आणा या बाबत चक्करा मारून मारून विच्याऱ्या शेतकऱ्याचा जिव टांगणीला लागला असुन दानशून सरकार , व प्रशासनातील बडे बाबू यावर तोडगा काढून शेतकऱ्यांची होणारी ही ससेहोपट प्रधान्याने सोडवणार का ? असा संतप्त सवाल शेतकरी वर्गातून आज पुढे येत आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.