कळंबच्या १० नगरसेवकांची भाजपाला साथ
ऑपरेशन टायगर किंवा ऑपरेशन टायगर म्हणून न पहाता कळंबच्या विकासासाठी भाजपाच्या सक्षम नेतृत्वावर टाकलेला विश्वास - आ . पाटील .
देशभक्त । न्युज सोलापूर प्रतिनिधी / -
सोलापूर येथे कळंब नगरपरिषदेतील ठाकरे गटाच्या ९ आणि काँग्रेसच्या १ अशा एकूण १० नगरसेवकांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी भाजपा परिवारात त्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करताना व्यासपीठावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे , आमदार राणाजगजितसिंह पाटील , माजी आ . सुजितसिंह ठाकूर भाजपा युवा नेते मल्हार पाटील ,भाजपा धाराशिव जिल्हा ध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी , माजी . जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी भाजपा पक्षात उबाठा गटाचे गटनेते नगरसेवक संजय मुंदडा, जमील मंहमद कासीम खाटीक, श्रीमती इंदुमती जयनंदन हौसलमल, श्रीमती रुकसाना चाँदसाब बागवान, श्रीमती वनमाला शंकर वाघमारे, श्रीमती. आशाताई सुधीर भवर, श्रीमती ज्योतीताई दीपक हारकर, श्रीमती सफुरा शकील काझी, सागर सुभाष मुंडे, श्रीमती अर्चनाताई प्रताप मोरे यांनी यावेळी जाहीर प्रवेश केला.यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले असुन हा मोठा धक्का मानला जात आहे .
हा केवळ पक्षप्रवेश नाही, तर कळंबच्या विकासासाठी भाजपाच्या सक्षम नेतृत्वावर व्यक्त केलेला अढळ विश्वास आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या विकसित व आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या वेगवान विकासाला बळ देण्यासाठी धाराशिव जिल्हा पूर्ण ताकदीनिशी भाजपाच्या पाठीशी उभा आहे, याचेच हे ठळक उदाहरण आहे अशी या पक्षप्रवेशावर आपली प्रतिक्रीया आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी प्रसार माध्यमांना दिली .
पुढे बोलताना ते असे म्हणाले की ,भाजपा म्हणजे केवळ निवडणुकीपुरते राजकारण नव्हे; सर्वसामान्य नागरिकाला केंद्रबिंदू मानून विकास, सुशासन आणि लोकहिताला सर्वोच्च प्राधान्य देणारी विचारधारा आहे. याच कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत विविध पक्षांतील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांचे भाजपाशी जोडले जात आहेत.
कळंबपासून धाराशिवपर्यंत भाजपाची संघटनशक्ती दिवसेंदिवस अधिक मजबूत होत आहे. प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याच्या अथक परिश्रमातून उभी राहिलेली ही ताकद आगामी काळातील विकासाच्या नव्या पर्वाची नांदी आहे.
ऑपरेशन टायगर किंवा ऑपरेशन टायगर म्हणून न पहाता कळंबच्या विकासासाठी भाजपाच्या सक्षम नेतृत्वावर टाकलेला विश्वास - आ . पाटील .
भाजपात झालेल्या पक्ष प्रवेशाकडे ऑपरेशन टायगर किंवा ऑपरेशन टायगर म्हणून न पहाता हा केवळ पक्षप्रवेश नाही, तर कळंबच्या विकासासाठी भाजपाच्या सक्षम नेतृत्वावर व्यक्त केलेला अढळ विश्वास आहे. हे सवर्जण माझेच कार्यकर्ते होते जसं की , पूर्वी कैलास होते असेही शेवटी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना आ . पाटील म्हणाले .
