बार्शी नगर परिषदेतील पदोन्नती प्राप्त कर्मचाऱ्यांचा सत्कार
देशभक्त न्युज - बार्शी प्रतिनीधी / -
बार्शी नगर परिषदेत लिपिक व वरिष्ठ लिपिक पदावर पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार आंबेडकरी समाज बांधवांच्या वतीने नगर परिषदेच्या डॉ जगदाळे मामा समिती सभागृहात आयोजित केलं होता
बार्शी नगर परिषद नगर अभियंता देशमुख व अग्निशमन विभाग प्रमुख नाणार यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
बांधकाम विभागात लिपिक पदावर काम करणारे सचिन खुडे यांना वरिष्ठ लिपिक पदावर व आरोग्य विभागातील सफाई कामगार पदावर काम करणारे आनंद कांबळे, सचिन पवार, भारत चव्हाण, अतुल बनसोडे, रेश्मा बोकेफोडे यांना लिपिक पदावर पदोन्नती मिळाली
यावेळी रिपाई नेते अविनाश गायकवाड, कामगार नेते अजित कांबळे, ऍड प्रसन्नजित नाईकनवरे, सनी गायकवाड, मिळकत विभाग प्रमुख भगवान बोकेफोडे, कुमार कांबळे, व कर्मचारी उपस्थित होते
पदोन्नतीसाठी प्रयत्न करणारे मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण , आस्थापना विभागाचे देवेंद्र गव्हाणे व गवळी यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
