बालवैज्ञानिक स्पर्धा परिक्षेत येरमाळ्याच्या कु. अनुष्का उमेश बारकुल हिचे यश
सिंगापूर येथील नासाच्या अभ्यास दौऱ्यासाठी भरतातुन येणाऱ्या ३० विद्यार्थ्यांमध्ये कु .अनुष्का बारकुल हिचा सामावेश
देशभक्त न्युज - येरमाळा / -
कळंब तालुक्यातील येरमाळा येथील ज्ञानोद्योग विद्यालय या शाळेची विद्यार्थीनी कु.अनुष्का उमेश बारकुल हिने घेण्यात आलेल्या बालवैज्ञानिक स्पर्धा परिक्षेत घवघवीत यश संपादन करून उत्तुंग कमगिरी दाखवली आहे . कु . अनुष्का ही ग्रामसेवक उमेश वशिष्ठ बारकुल यांची कन्या असुन तीला या परिक्षेसाठी ज्ञानोद्योग विद्यालयाच्या मुख्याध्यापक , शिक्षवृंदाचे मार्गदर्शन लाभले आहे . नासा मार्फत घेण्यात आलेल्या बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तुंग असे यश संपादन करून तिची सिंगापूर येथील नासाच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झालेली आहे. कुमारी अनुष्का हिचे या यशाबद्दल सर्वच स्तरातुन अभिनंदन होत असुन तीला पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत .या दौऱ्यासाठी सबंध भारतामधून केवळ 30 विद्यार्थ्यांचीच निवड झाली आहे आणि या 30 विद्यार्थ्यांमध्ये कु. अनुष्काची निवड झाली आहे .
