उस्मानाबाद गडदेवदरी येथे पहिली अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद संपन्न करण्याचे नियोजन
संपन्न होणाऱ्या या धम्म परिषदे बाबत लवकरच पत्रकार परिषद घेवून सर्व माहिती प्रसिद्ध करण्यात येणार - भंते सुमेधजीनागसेन
देशभक्त न्युज - उसमानाबाद प्रतिनीधी / -
तगर भूमी बुद्ध विहार गडदेवदरी परीसर ता.जि.उस्मानाबाद येथे पहिली अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात येणार असुन या धम्म परिषदेसाठी लातूर , उस्मानाबाद, सोलापूर जिल्ह्य़ातील बौद्ध उपासक , उपासिका , बालक , बालिका , भंते गण उपस्थित राहणार आहेत. यासाठी धम्म परिषदे च्या निमित्ताने उपस्थित राहणारे सर्व भंतेजी प्रथम "तेर येथील चैत्य - स्तूपाची " वंदना करण्यासाठी तेर येथे जाऊन नंतर त्यांचे धम्म परिषदेकडे प्रयाण होईल . संपन्न होणारी ही धम्म परिषद भव्य दिव्य व्हावी म्हणून लवकरच यासंदर्भात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे व त्या पत्रकार परिषदेतुन संपन्न होणाऱ्या धम्म परिषदेची पूर्ण माहिती देण्यात येणार आहे . प्रत्येक धम्म बांधवांनी आपणास जसा वेळ उपलब्ध होईल तसा तगर भूमीचा व धम्म परिषदेचा प्रसार व प्रचार करावा असे अवाहन भंते सुमेधजी नागसेन ( तगर भूमी उसमानाबाद ) यांनी केले आहे .
