प्रियदर्शनी अर्बन को - ऑप बॅंकेची 27 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न झाली असल्याची बँकेचे अध्यक्ष प्रा.श्रीधर बाबा भवर यांची माहिती
देशभक्त न्युज - कळंब । प्रतिनीधी / -
प्रियदर्शिनी अर्बन को -ऑप बँक लि कळंब बँकेच्या सभासदांना 6 टक्के लाभांश देण्यात येणार असल्याचे प्रियदर्शिनी अर्बन बँकेचे चेअरमन प्रा.श्रीधर बाबा भवर यांनी जाहीर केले. प्रियदर्शिनी अर्बन को -ऑप बँक लि कळंब बॅंकेची 27 वी वार्षिक सर्वसाधारण सभा बॅंकेच्या मुख्य कार्यालयाच्या सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात झाली.
यावेळी व्यासपीठावर प्रियदर्शनी अर्बन को- ऑप बॅंकेचे चेअरमन प्रा.श्रीधर बाबा भवर तसेच बँकेचे संचालक नानासाहेब इखे,विजयानंद तांबारे, विलास आडणे , सूर्यभान सोनवणे , डॉ. ऋषिकेश भवर , तज्ञसंचालक योगीराज लांडगे , बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी प्रदीप शिंदे, ॲड . प्रवीण यादव उपस्थित होते.प्रारंभी लक्ष्मी पूजन करण्यात आले.
बँकेला ३१ मार्च २०२४ अखेर नफा हा १ कोटी ८८ लाख रुपयाचा झालेला आहे. बँकेचे भागभांडवल मार्च २०२३ अखेर ३ कोटी ६० लाख १९ हजार होते त्या तुलनेत मोठी वाढ होऊन ती ३१ मार्च २०२४ वर ४ कोटी ६ लाख ९ हजार झाले आहे. मागिल वर्षाच्या तुलनेत ती १२.७५ % वाढ झाली आहे. ३१ मार्च २०२३ या वर्षाच्या ठेवीच्या तुलनेत १५.३०% वाढ होऊन ३१ मार्च २०२४ मध्ये त्या ९२ कोटी ५३ लाख ९१ हजार झाल्या आहेत. बँकेचे एकूण कर्ज वाटप ३१ मार्च २०२४ अखेर ५५ कोटी ७५ लाख २४ हजार एवढे आहे. बँकेला एन.पी.ए प्रमाण ० % ठेवण्यात यश आले आहे. , अध्यक्ष प्रा.श्रीधर बाबा भवर यांनी याप्रसंगी सांगितले.
या सभेमध्ये संचालक मंडळाने तयार केलेल्या आर्थिक वर्ष २०२३ - २४ चा अहवाल व शिफारस केलेल्या आर्थिक वर्षा २०२४ - २५ च्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. तसेच आर्थिक वर्ष २०२३ -२४ च्या नफा विभागणीला मंजूरी, आर्थिक वर्ष २०२४ - २५ मध्ये बाहेरून उभारावयाच्या निधीची मर्यादा ठरवणे, वसुलीचे हक्क अबाधित ठेवून संशयित व बुडीत कर्ज खात्यांचे निर्लेखन करणे आदी विषयांवर चर्चा होऊन सभासदांनी विषय मंजूर केले. याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालक मंडळाने सभासदांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली.
यावेळी सभासद ॲड .प्रविण यादव यांनी मनोगत व्यक्त करुन बॅंकेच्या भरभराटीसाठी शुभेच्छा दिल्या.
वार्षिक सर्वसाधारण सभेच्या विषय पत्रिकेचे वाचनबँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी प्रदीप शिंदे यांनी केले. बँकेचे संचालक नानासाहेब इखे यांनी प्रास्ताविक केले. संतोष गायकवाड यांनी सूत्रसंचालन तर संचालक सूर्यभान सोनवणे यांनी आभार प्रदर्शन केले.


