वाशी तालुक्यातील विविध शाळेत किशोर किशोरी हितगुज मेळावे संपन्न
देशभक्त न्युज - वाशी । प्रतिनिधी / -
वाशी तालुक्यातील इंदापूर ,पारडी जिल्हा परिषद शाळा , अजिंक्य प्राथमिक विद्यामंदिर वाशी , प्राथमिक विद्यामंदिर मांडवा येथे वंचित विकास जाणीव संघटनेच्या वतीने किशोर किशोरी हितगुज मेळावे घेण्यात आले यामध्ये किशोर किशोरी चे प्रश्न गैरसमज व्यक्तिमत्व विकास संवाद कौशल्य नेतृत्व कौशल्य गुणवत्ता वाढी विषयी मार्गदर्शन जाणीव संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ लगाडे यांनी घेतले यावेळी खेळ गाणे गोष्टी स्पर्धात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते .
यावेळी मुख्याध्यापक माने बी. पी . , शिंदे एम .बी . ,चौधरी ए. बी . , कुंभार पी .एम . ,श्रीमती म्हेत्रे एस. पी. , मुख्याध्यापक मिलिंद करंडे. , गवळी बी .एल. , केळे एस. एल . ,चोरगे के. बी ., महाकले जी सी , काशीद डी सी , मस्के वाय .बी. , संस्थापक एस .एल . पवार , मुख्याध्यापिका श्रीमती मनीषा माने , जि.प.शा.मांडवा शाळेचे मुख्याध्यापक दावणे यांच्या सह शिक्षक पवार , सोनुले , पाळवदे , शिक्षिका श्रीमती कडबने , पांढरे ,यांनी परिश्रम घेतले या हितगुज मेळाव्याला 700 ते 800 किशोर किशोरी सहभागी झाले होते.



