सेवा सुशासन गरीब कल्याणचे ११ वर्ष यानिमित्ताने राबविण्यात येणाऱ्या संकल्प ते सिध्दी या अभियानाच्या अनुषंगाने विकसित भारत संकल्प मेळावा मित्रा संस्थेचे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब येथ संपन्न
देशभक्त न्युज - कळंब प्रतिनिधी / -
कळंब येथील जय भवानी हॉल येथे सेवा सुशासन गरीब कल्याणचे ११ वर्ष यानिमित्ताने सध्या सर्वत्र राबविण्यात येणाऱ्या संकल्प ते सिध्दी या अभियानाच्या अनुषंगाने विकसित भारत संकल्प मेळावा मित्रा संस्थेचे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार दि . २३ जून रोजी संपन्न झाला.
यावेळी भाजपाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी नवनियुक्त मंडल अध्यक्ष अरुण काका चौधरी, दत्तात्रय साळुंखे, मकरंद पाटील यांचा सत्कार केला. आगामी होणाऱ्या सर्वच निवडणुकांच्या अनुषंगाने संघटनात्मक रचना कशा असल्या पाहिजेत याबद्दल मान्यवरांनी उपस्थितांनत मार्गदर्शन केले.
यावेळी धाराशिव जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, रामहरी अप्पा शिंदे, अरुण काका चौधरी, दत्तात्रय साळुंखे, मकरंद पाटील , विकास बारकुल, संजय पाटील, अशोक शिंदे, विनेंद्र अण्णा, पंडीत टेकाळे, संजय घोगरे, बालाजी अडसूळ, उत्तम टेकाळे, अशोक तांबारे, भागचंद बागरेचा. यांच्यासह तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते या कार्यक्रमास उपस्थित होते.
