महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्थेची खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक संपन्न
चेअरमन ते व्हाईस चेअरमन आणि सर्व संचालक मंडळ यांच्या बिनविरोध निवडी
देशभक्त न्युज - उमरगा प्रतिनिधी / -
शहरातील महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी कैलास शिंदे यांची तर व्हाईस चेअरमनपदी दत्तू कांबळे यांची बिनविरोध निवड झाली असुन हि निवड दि.२४ जून रोजी करण्यात आली.
सदरील निवड ही उमरगा येथील संस्थेच्या कार्यालयात प्राधिकृत अधिकारी एन.पी. हाडुळे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक बोलावण्यात आली होती. त्या बैठकीत बिनविरोध चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडी नंतर नूतन चेअरमन शिंदे, व्हा चेअरमन कांबळे व संचालकांचा सत्कार करण्यात आला. महात्मा फुले नागरी सहकारी पथसंस्थेच्या अगदी खेळी मेळीच्या वातावरणात झालेल्या या पंचवार्षिक निवडणूकीत बिनविरोध निवड झालेल्या संचालकामध्ये मत्सेंद्र सरपे, आप्पाराव गायकवाड, अभिमन्यू सुर्यवंशी, संतोष सुरवसे, रमेश जकाते, किरण सगर,अयोध्या कांबळे आणि हेमलता कोणाळे यांचा समावेश आहे.
