खबरदार ..... विविध योजना मंजूरी संदर्भात लाभधारकांना कोणी पैशाची मागणी कराल , पंस कार्यालयात तक्रार दाखल करण्याचे नुतुन गटविकास अधिकारी विनोद जाधव यांचे नागरीकांना अवाहन
देशभक्त न्युज - कळंब प्रतिनिधी / -
शेतकरी व अन्य नागरीक वैयक्तीक लाभाच्या विहीर आणि इतर योजना मंजुरीसाठी कळंब पंचायत समितीमध्ये अर्ज करतात अशा दिलेल्या अर्जाच्या मंजूरी बाबत कोणी पैशाची मागणी केल्यास आणि त्याबाबत तशा स्वरूपची तक्रार प्राप्त झाल्यास आता तात्काळ कारवाई होणार असल्या बाबतच चर्चा दरम्यान पंचायत समितीचे नुतुन गटविकास अधिकारी विनोध जाधव यांनी देशभक्तशी संवाद साधताना दिली .
कळंब पंचायत समितीचे तरुण ,तडफदार त्यांच्या बोलण्यातून ज्या कामासाठी आपण ज्या खुर्चीत बसलो आहोत याची परिपूर्ण जाण ठेवून कर्तव्यतत्पर सेवा बजावणे असे कळंब पंस . चे नुतुन गविअ जाधव पुढे बोलताना म्हणाले की , कृषिप्रधान म्हणून संबोधल्या जाणाऱ्या देशातील शेतकऱ्यांसाठी प्रशासन स्तरावरून त्यांची आर्थिक उन्नती साधावी त्यांची शेती बागायती व्हावी म्हणून राज्यासह केंद्र सरकारने सिंचन विहीर , जनावरांच गोठा, अनुदानावर मोटार, पीव्हीसी पाईप , बियाणे , जुनी विहीर दुरुस्ती , फवारणी साठी पंप , इतर नागरीकांना त्यांचेही जिवनमान उंचवावे यासाठी वैयक्तीक योजना योजना सुरू केल्या आहेत. घरकुल योजनेच्या माध्यमातून बेघरवाल्यांना घरे देण्यासाठी रमाई आवास, प्रधानमंत्री आवास , आदिवासी साठी योजना यासह अन्य घरकुल योजना सुरू केलेल्या आहेत. या योजनेच्या मंजुरीसाठी लाभार्थ्यांना ग्रामपंचायत कार्यालया मार्फत पंचायत समिती कार्यालयात प्रस्ताव सादर करावे लागतात. अशा विविध योजनेच्या मंजुरीसाठी लाभार्थ्यांनी प्रस्ताव सादर करताना परिपूर्ण कागदपत्रे सोबत जोडावीत जेणेकरून त्यांच्या परिपूर्ण प्रस्तावासाठी त्यांना कोणतीही अडचण येणार नाही .
संबंधित लाभार्थ्याचा प्रस्ताव परिपूर्ण असतानाही कोणी जर योजनेच्या मंजुरीसाठी लाभार्थ्यांकडून पैशाची मागणी करत असेल आणि तशी एखादी तक्रार प्राप्त झाली तर खबरदार ..... आशा व्यक्तीची गय केली जाणार नाही त्यावर कारवाई केली जाईल असेही बोलताना गविअ . जावध म्हणाले त्यासाठी ज्या लाभधारकांसोबत अशा प्रकार घडेल त्यांनी तातडीने कळंब पंचायत समिती कार्यालयात तक्रार द्यावी. असे आवाहनही यावेळी शेवटी त्यांनी नागरिकांना केले आहे .

