Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जनहित पतसंस्थेच्या चेअरमनपदी सौ . माशाळकर तर व्हाईस चेअरमनपदी कवडे यांची निवड

चेअरमनपदी सौ.श्रुतीताई वल्लभ माशाळकर यांची तर व्हा. चेअरमन म्हणुन नितिन कल्याणराव कवडे यांची निवड बी.ए.शिंदे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कळब यांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न 


देशभक्त न्युज - येरमाळा प्रतिनिधी  / -

कळंब तालुक्यातील येरमाळा येथील जनहित पतसंस्थेची निवडणूक आज दि . ३० जून रोजी नुकतीच पार पडली असुन यामध्ये चेअरमन व व्हाईस चेअरमन यांची निवड करण्यात आली, यावेळी निवडूणूक अधिकारी म्हणुन बी . ए.शिंदे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कळब यांनी काम पाहिले . शिंदे यांच्या अध्यक्षेतेखाली सदरील पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असुन यावेळी सर्व संचालक उपस्थीत होते .  खेळीमेळीच्या वातावरणात पदाधिकाऱ्यांच्या संपन्न झालेल्या या निवडी मध्ये  चेअरमनपदी सौ.श्रुतीताई वल्लभ माशाळकर यांची तर व्हा. चेअरमन म्हणुन नितिन कल्याणराव कवडे यांची निवड करण्यात आली, यावेळी नुतन संचालक म्हणून नवले बळीराम, तौर बाबासाहेब, कोकाटे रामकीसन,रणसिंग दत्तात्रय, भगत अंकुश, शिंदे सुनिल,सौ.मनिषा गणेश मोरे, जाधवर संगिता शिवाजी, उगडे स्वाती गोवर्धण,घेवारे प्रिया शिवप्रसाद यांचा सामावेश असुन यावेळी नूतन चेअरमन, व्हा.चेअरमन आणि संचालक यांचा सत्कार जनहित परिवाराचे संस्थापक संतोष तौर, वल्लभ मशाळकर,गणेश मोरे, संतोष आगलावे, यांच्या हस्ते करण्यात आला , यावेळी समाधान भगत, रमेश बारकुल, अभिजित कुलकर्णी, अभिजित पाटील, शिवाजी जाधवर,पवण ओव्हाळ, निशांत कांबळे,संदेश वाधमारे जिवण जाधव , सभासद , खातेदार मोठया संख्येनी उपस्थित होते शेवटी अभार संस्थेचे व्यवस्थापक शिवप्रसाद घेवारे यांनी मानले .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.