पुरस्काराने युवा शेतकऱ्यांना ऊर्जा मिळेल... सपोनि .धरणीधर कोळेकर
कळंब तालुका पत्रकार संघाने पत्रकारीता क्षेत्रासह सामाजिक बांधिलकी जोपासल्याने सर्वस्तरात संघाच्या उतुंग कार्याचा सर्वत्र डंका
देशभक्त न्युज - शिराढोण प्रीतिनधी / -
कळंब तालूक्यातील निपाणी येथील महिला शेतकरी सौ.परविन फकरुद्यीन शेख यांच्या कृषी क्षेत्रातील कामगीरीची दखल घेत कळंब तालूका पत्रकार संघा तर्फे दिला जाणारा स्व.राजेंद्र मुंदडा कृषी वैभव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या पुरस्काराचा वितरण सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे , यांच्या मार्गदर्शनाखाली शिराढोण येथील गायत्री काॅम्प्यूटर्स च्या सभागृहात पार पडला.. या पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी सरपंच लक्ष्मीताई म्हेत्रे या होत्या तर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डाॅ.अमोल पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक धरणीधर
कोळेकर, पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर पवार यांची उपस्थिती होती. या सर्वांच्या उपस्थीतीत महिला शेतकरी.परविन शेख व त्यांचे पती फकरुद्यीन शेख यांचा पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.या मध्ये सन्मानपत्र, स्मृती चिन्ह, ऊर्जस्तंभ पुस्तक, शाल याचा समावेश होता.पुरस्काराचे हे चौथे वर्ष होते.
या कार्यक्रमात सहाय्यक पोलीस निरीक्षक धरणिधर कोळेकर यांनी कळंब तालूका पत्रकार संघाच्या वतिने देण्यात येणारा हा कृषी वैभव पुरस्काराचा उपक्रम अतिशय स्तूत्य असून या माध्यमातून शेती क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या शेतकऱ्यांना उर्जा प्राप्त होईल, आणि चांगल्या पध्दतीने युवा शेतकरी आधुनिक शेती करुन आपल्या कूटूंबाचा आर्थीक उत्कर्ष करतील असे मत यावेळी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जेष्ठ पत्रकार जगदिशचंद्र जोशी यांनी केले. कार्यक्रमासाठी गावातील ग्रामपंचायत सदस्य ॲड .नितीन पाटील, राजू डांगे, चंद्रकांत महाजन,नवनाथ खोडसे, पवन म्हेत्रे, बाळासाहेब कणसे, बालाजी काटे, दिनेश कावळे , बालाजी धाकतोडे, स्व.राजेंद्र मुंदडा यांचे चिरंजिव गौरव मुंदडा यांची उपस्थीती होती. कार्यक्रमासाठी जेष्ठ पत्रकार जगदिशचंद्र जोशी, रणजित गवळी, राहूल ओमणे, दादा खतीब, ताजखाॅं पठाण, आकाश पवार, राहूल पाटील, अमोलसिंह चंदेल यांनी पुढाकार घेतला.
तिन एकरातून आर्थीक उन्नती
निपाणी ता.कळंब येथील महिला शेतकरी परविन फकरुद्यीन शेख यांनी तिन एकर क्षेत्रात स्वतः कष्ट करुन विविध प्रयोगातून उन्नती साधली आहे. टरबूज, टोमॅटो, मिरची, घेवडा आदी उत्पादन घेत शेतीपुरक दुग्ध व्यावसायही करुन त्यांनी आपली आर्थीक उन्नती केली आहे. त्यांच्या अथक परीश्रमातून फुलवलेल्या शेती क्षेत्रातील कामगरीची दखल कळंब तालूका पत्रकार संघाने घेवून स्व.राजेंद्र मुदडा कृषी वैभव पुरस्कार देवून गौरव केल्याने शिराढोण गाव व परीसरात सार्थ व योग्य निवड केल्याची भावना व्यक्त होत आहेत.
