धाराशिव जिल्ह्यात भाजपाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या संकल्प ते सिद्धी अभियानांतर्गत जनता दरबारास येरमाळा येथे युवानेते मल्हार दादा पाटलांच्या एन्ट्री ने नागरीक , स्थानिक पदाधिकारी ,कार्यकर्ते यांच्यात उत्साह
देशभक्त न्युज - येरमाळा प्रतिनिधी / -
०२ जुलै रोजी येरमाळा येथे भाजपाचे युवा नेते मल्हार दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संकल्प ते सिद्धी अभियानांतर्गत जनता दरबाराचे आयोजन भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातुन करण्यात आले होते येरमाळा येथील संपन्न झालेला कार्यक्रम हा जिल्ह्यातील ३९ वा जनता दरबार होता, या कार्यक्रमास मल्हार दादाच्या पाटलांच्या उपस्थित एन्ट्री ने स्थानिक , परिसरातील नागरीक यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी , कार्यकर्ते यांच्यात नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र लोकांच्या लक्षणीय उपस्थितीमुळे दिसुन येत होते .
संपन्न झालेल्या कार्यक्रमातुन उपस्थित नागरिक , कार्यकर्ते यांनी तक्रारी नोंदवल्या यामध्ये प्रमुख तक्रारी खामगाव ते पंढरपूर रस्त्यावरील घाटातील अर्धवट काम पूर्ण करण्यासंदर्भात, येरमाळा चौक ते भीम नगर पर्यंत रस्त्यासोबत नाली नसल्याने होणाऱ्या समस्येबाबत तसेच तेरणा हॉस्पिटल नेरूळ येथे मोफत उपचारासंदर्भात , उद्योग, कर्ज, रस्ता, नाली, महावितरण ,निराधार हप्ता या संदर्भात विविध समस्यांची यावेळी नोंद करून घेण्यात आली .
आज पर्यंत जिल्ह्यात झालेल्या जनता दरबारामध्ये एकूण १०३३ तक्रारींची नोंद होऊन त्या तक्रारी निराकरणाची प्रक्रिया चालू आहे.
या कार्यक्रमासाठी मल्हार दादा पाटील, नेताजी आबा पाटील, अरुण काका चौधरी, विकास बारकुल, आबासाहेब बारकुल, गणेश बारकुल, पोपटदादा जेवे, खंडेराव मैंदाड , राजाभाऊ बांगर, बाबुभाई शेख, संजय अडसूळ, रामकिशन कोकाटे, मदन बारकुल, विशाल बारकुल. यांची प्रमुख उपस्थिती होती .
.

