Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अतिवृष्टीमुळे रिपब्लिकन पक्षाचा 68 व्या वर्धापन दिनाचा दिनांक 3ऑक्टोबर चा कार्यक्रम रद्द -केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

अतिवृष्टीमुळे रिपब्लिकन पक्षाचा 68 व्या वर्धापन दिनाचा दिनांक 3ऑक्टोबर चा कार्यक्रम रद्द -केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

रिपब्लिकन पक्षाचा यंदाचा 68 वा वर्धापन दिन आता 3 ऑक्टोबर ऐवजी 3 नोव्हेंबर रोजी महाड येथे संपन्न होणार .....

देशभक्त न्युज - मुंबई / प्रतिनिधी  / -

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा वर्धापन दिन दरवर्षी 3 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येतो.यंदा 3 ऑक्टोबर रोजी रिपब्लिकन पक्षाचा 68 वा वर्धपन दिन महाड जिल्हा रायगड येथे आयोजित करण्यात आला होता.मात्र राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकट कोसळले आहे.शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.त्यांच्या दु:खात सहवेदना व्यक्त करण्यासाठी आणि पुरग्रस्त शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी रिपब्लिकन पक्षाने दिनांक 3 ऑक्टोबर रोजी आयोजित केलेला रिपब्लिकन पक्षाचा 68 वा वर्धापन दिनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. रिपब्लिकन पक्षाचा यंदाचा 68 वा वर्धापन दिन आता 3 ऑक्टोबर ऐवजी पुढील महिन्यात 

येत्या दिनांक 3 नोव्हेंबर रोजी महाड जिल्हा रायगड येथे आयोजित करण्यात आला असल्याची अधिकृत घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना .रामदास आठवले यांनी केली आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची मोठी हानी झाली आहे.शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.पुरामध्ये गाई,गुरु वाहुन गेली आहे.शेतपीके वाहुन गेली आहेत. शेतकरी संकटात सापडला आहे अशा काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी ऊभे राहण्यासाठी रिपब्लिकन पक्षाने 3 ऑक्टोबरचा 68 वा वर्धापन दिनाचा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दिनांक 3 ऑक्टोबर ऐवजी येत्या दिनांक 3 नोव्हेंबर रोजी रिपब्लिकन पक्षाचा 68 वा वर्धापन दिन महाड जिल्हा रायगड येथे आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे .नैसर्गिक संकटात सापडलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सर्वांनी मदत केली पाहिजे .रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई,पुणे विविध शहरातील कार्यकर्त्यांनी तसेच उद्येजकांनी कॉर्पोरेट कंपन्यांनी आप-आपल्यापरिने पूरग्रस्त संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहान ना.रामदास आठवले यांनी केले आहे.पुरग्रस्त शेतकऱ्यांना चटई,चादर,तांदुळ,पिठ,साखर, तेल साबण असे जीवनाश्यक वस्तु तातडीने पुरग्रस्त शेतकऱ्यांना पाठवण्याचे आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले आहे. राज्य सरकारने ही तातडीने आर्थिक आणि जीवनाश्यक वस्तुची मदत तातडीने करण्यात यावी अशी सुचना ही ना.रामदास आठवले यांनी केली आहे.

रिपब्लिकन पक्षाचा यंदाचा 3 ऑक्टोबरचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम रद्द करुन पुढे ढकलण्यात आला आहे. दिनांक 3 ऑक्टोबर ऐवजी 3 नोव्हेंबर रोजी रिपब्लिकन पक्षाचा 68 वा वर्धापन दिन क्रांतिभूमी महाड जिल्हा रायगड येथे साजरा करण्यात येणार असल्याचे ना. रामदास आठवले यांनी अधिकृत जाहीर केले असुन हेमंत रणपिसे यांनी तशी बातमी प्रसिद्धीस दिली आहे.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.