सरकारने ओला दुष्काळ व शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही केल्यास आंम्ही रस्त्यावर उतरू आणि गरज पडली तर आम्ही कोर्टाकडे जाऊ मा . खा . राजू शेट्टी यांचा पत्रकार परिषदेतून महायुती सरकारला इशारा
देशभक्त न्युज - परंडा / प्रतिनिधी ( फारूक शेख )
शेतक-यांच्या संपूर्ण कर्जमाफीसह राज्य ओला दुष्काळ जाहीर करावा अन्यथा रस्त्यावर उतरणार असा ईशारा राज्य सरकारला शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.माजी खासदार राजू शेट्टी हे अतिवृष्टीग्रस्त धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी आज दि.३ ऑक्टोंबर रोजी परंडा तालुक्यात भोत्रा येथे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून परंडा येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतली यावेळी राजू शेट्टी म्हणाले की, दुष्काळ याचा अर्थ काय पिक पाणी न येणे, आता नेमकी तीच परिस्थिती झाली १० मे पासून सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे पूर्ण खरीप पिकाची नासाडी झाली आहे स्वतः मुख्यमंत्री वारंवार सांगता आहेत या वर्षी सरासरीच्या ११०% पाऊस जास्त झाला आहे. ओला दुष्काळ जाहीर करायला हाच सगळ्यात मोठा पुरावा आहे. म्हणून अशा परिस्थितीत सरकार ओला दुष्काळ का जाहीर करीत नाही दुष्काळ सदृश्य परिस्थिती सांगणे वेगळे आणि अनुषंगिक उपायय उपाययोजना करतो असे सांगणे वेगळे आहे न सरकारने जर ओला दुष्काळ जाहीर केला असता तर जे पिक पूर्णपणे बाधित झाले आहे त्या पिकावर काढलेले कर्ज पूर्ण माफ झाले असते. मग ते थकीत असो अथवा नसो, सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ झाली असती, सध्याच्या कठीण काळामध्ये सरकारची जे देणे आहेत महावितरणची असो आणि काही असो त्याच्या वसुलीला स्थगिती मिळाली असती म्हणून आम्हाला ओला दुष्काळ + पाहिजे असे म्हणत राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेतून सरकारचा समाचार घेतला पुढे बोलताना ते म्हणाले एक तर महायुती सरकारने एक वर्षांपूर्वी सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते ते राहिले बाजूला किमान आता या सरकारने ओला दुष्काळ तरी जाहीर करावा असे पत्रकार परिषदेत सांगितले २९ ऑगस्ट २०१९ ला स्वतः मुख्यमंत्री असताना त्यांनी एक शासन निर्णय केला होता त्यावेळी महाराष्ट्रात अशीच अतिवृष्टी झाली होती त्या शासन निर्णयानुसार ज्या शेतकऱ्याचे पीक ५० टक्के पेक्षा जास्त बाधित झालेले आहे त्या शेतकऱ्यांनी त्या पिकावर काढलेले पीक कर्ज थकीत असो अथवा नसो ते पूर्णपणे माफ करावे अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी या पत्रकार परिषदेतून केली आहे . यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे , शिवसेना उबाठा गटाचे रंजीत दादा पाटील, जयकुमार जैन, तानाजी पाटील, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष शंकर घोगरे, रामेश्वर नेटके, सुबराव देशमुख, शिवाजी ठवरे, आप्पासाहेब तरटे आदींची उपस्थिती होती.
