कोर्डेवाडी उपोषणातील मागण्यांची धग प्रशासनाच्या ऐरणीवर केज तहसिल कार्यालया समोर धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने बैलगाडी पेटवून निषेध आंदोलन
शेतकरी व सामान्य जनतेचे हे आंदोलन सरकाने हालक्यात घेवू नये - बाळराजे दादा आवरे - पाटील यांचा इशारा
देशभक्त न्युज - केज प्रतिनिधी / -
केज तालुक्यातील कोर्डेवाडी येथे राजश्रीताई उंबरे - पाटील या ३ ऑक्टोबर पासुन मराठवाड्यातील ज्वलंत अशा विविध प्रश्नावर अमरण उपोषणास बसल्या असुन प्रशासनाच्या ढिसाळ हलगर्जी कारभारामुळे कोर्डेवाडी उपोषणातील मागण्यांची धग आता प्रशासनाच्या ऐरणीवर धडकली असुन दि . ८ ऑक्टोबर रोजी केज तहसिल कार्यालया समोर धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने बैलगाडी पेटवून प्रशासनाच्या कर्तव्या बाबत घोषणा देवून निषेध आंदोलन करण्यात आले .
- : उपोषणातील प्रमुख्य मागण्या : -
कोर्डेवाडी येथील साठवण तलाव , शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी , विविध शैक्षणिक क्षेत्रातील सर्व शैक्षणिक शुल्क माफी , ज्ञानराधा बँकेच्या ठेवीदारांना न्याय्य आदि . मागण्या संदर्भात प्रशासननाच्या माध्यमातुन सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे अमरण उपोषणाचे आंदोलन सुरु आहे .
- : बाळराजे दादा आवरे - पाटील यांचा सरकारला इशारा : -
सामान्य जनतेचे हे आंदोलन सरकाने हालक्यात घेवू नये याचा वनवा मराठवाड्यात पेट घेईल असे धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळराजे दादा आवरे - पाटील म्हणाले व त्यांनी बीड जिल्हा व केज तालुक्यातील प्रशासनाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आणला . ते म्हणाले केज तालुक्यातील कोर्डेवाडी उपोषण आंदोलना पूर्वी प्रशासनस्तरावर निवेदने देण्यात आली होती परंतु प्रशासनातील अधिकाऱ्यांना या आंदोलनाचा विसर पडला आहे .चक्क त्यांनी या आंदोलना बाबत माहीत नसल्याचाच निर्वाळा दिला असुन त्यांच्या या बेजबाबदार वक्तव्याने सरकार तर यांना पाठीशी घालीत नाही ना ? असा संशय निर्माण होत असुन सुरु असलेल्या आंदोलना बाबत प्रशासन स्तरावर तात्काळ आंमलबजावणी न झाल्यास शिवराय आणि संभाजी राजे यांचे मावळे गनिमी काव्याने सरकारच्या विरोधात आंदोलने करतील असा गंभीर इशारा आंदोलना वेळी बोलताना आवारे - पाटील यांनी दिला .
या आंदोलनात आंदोलन कर्त्यांनी काळ्या फीती बांधून प्रशासनाच्या कारभाराचा निषेध करीत हे आंदोलन केले तर या आंदोलनातील कोर्डेवाडी येथील प्रवीण नागरे , सलमान खान , पुष्पक देशमुख ,स्वप्नील वरपे , संभाजी आघाव , संदीप चालक , प्रमोद कोरडे , गंगाधर यादव , गणेश राख , शोकात शेख , विशाल कुठे आदिंचा सामावेश होता .


