खामसावाडी जिप . गटातील गाव जनविकासात्मक कामासाठी भापसे पार्टीच्या दिपकभाऊंना एक कॉल प्रॉब्लेम सॉल परिसरातील नागरीकांची चर्चा
खामसवाडी , गोविंदपूर , माळकरंजा , वाठवडा गावांचे विकासात्मक कामातुन रुपडे बदलतय तर बोरगाव , वडगाव , देवळाली गावेही लवकरच प्रकाशमय होण्याच्या प्रगती मार्गावर
देशभक्त न्युज - प्रतिनिधी / - खामसवाडी / गोविंदपूर / माळकरंजा / वाठवडा
सध्या सर्वत्र नगरपंचायत निवडणूकांचे धूमशान सुरु असुन या धामधूमीनंतर जिल्हापरिषद , पंचायत समिती या निवडणूकांचा आखाडा सुरु होणार असून सर्वच राजकीय पक्ष सामाजिक संघटना यांनी आपआपल्या सोयीनुसार जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणासाठी पक्षांचे वरिष्ठ नेतेमंडळी यांचे सदरील निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारीबाबत विविध माध्यमांतुन तगड्या फिल्डींग लावण्यास सुरुवात केल्या आहेत जेणेकरून उमेदवारीची माळ आपल्याच गळ्यात पडावी .
अशा धाम धूमीच्या काळात कळंब तालुक्यातील मस्सा ( खं . ) गावचे रहिवाशी असलेले व धाराशिव जिल्ह्यात मस्सा (खं . )गावचा गावविकासात्मक सर्वांगिण विकास भापसे पार्टी पक्षाच्या माध्यमातून करून गावचा चेहरामोहरा बदलून एक अगळी वेगळी ओळख निर्माण करणारे व यापूर्वी मागिल झालेल्या जिल्हापरिषद निवडणूकीत मस्सा (खं .) या '"गाव विकासात्मक " मॉडेलवर धाराशिव जिल्हा परिषदेत ईटकूर जिप गटातून सौ . राधाताई दिपक ताटे यांना अपक्ष निवडून आणून जिप .सत्ता स्थापनेत या अपक्ष सदस्यामुळे मराठवाड्यात सर्वत्र बातम्यांच्या माध्यमातून भापसे पार्टी पक्ष चर्चेतआला .
यंदा होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकी अगोदरच भापसे पार्टी पक्षाच्या माध्यमातून पक्षाचे अध्यक्ष दिपकभाऊ ताटे यांनी खामसवाडी या राखीव जिप . गटातील गावात रोकडेश्वरी देवस्थान ट्रस्टला येथील परिसरातील नागरीकांच्या आरोग्य सेवेसाठी नवी कोरी वातानुकुलीत अँम्बुलन्स दिली असुन त्याचा जंगी लोकार्पण सोहळाही मोठ्या जनतेच्या गर्दीत संपन्न झाला .
खामसवाडी गावात मोठ्या चौकात मोठे मॅटेलाईट पोल व प्रमुख्य रस्त्यावर छोटे लाईट पोल उभारून गाव प्रकाशमय केले , गोविंदपूर बस थांबा ते गवातील यमाई मंदिरापर्यंत लाईट पोल उभारून त्यावर मर्क्यूरी बल्ब व्यवस्था करून रस्त्यावरून येजा करणाऱ्या गावकऱ्यांसाठी उजेड व्यवस्था ,गावात यात्रेसाठी मोठी देणगी देवून यात्रा गावकरी व भक्त भाविक यांच्या मोठ्या संख्येने साजरी करताना गावातील नागरीका कडूनच येथील यमाई देवी मंदिरात त्यांच्या उमेदवारीची घोषणा यामुळे सर्वच पक्षांच्या इच्छुक उमेदवारात मात्र चिंतेचे वातावर निर्माण झाले असुन गावकऱ्यांनी दिपकभाऊ ताटेंची उमेदवारी घोषित केल्यामुळे राजकीय कंपूत मोठी खळबळ उडाली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे .
माळकरंना येथील जिल्हा प्रमुख मार्गावरील बसस्टॉप रस्त्यावर लाईट पोल त्यावर मर्क्यरीलाईट आणि सिसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले .
वाठवडा गावतील नागरीकांनी शालेय मूलांना खेळण्यासाठी क्रिडांगण व सिसिटीव्ही कॅमेरे , लाईट पोल बसविण्याची मागणी करताच त्याठिकाणी सर्व व्यवस्था करण्या आल्या यामुळे जिल्हा परिषद निवडणूकां अधिच गावच्या विकासाची पताका खांद्यावर घेवून निघालेल्या दिपक भाऊ ताटेंच्या बाबतीत सर्वत्र एकच हवा ती म्हणजे गावच्या विकासात्मक समस्यासाठी भापसे पार्टी पक्षाच्या दिपकभाऊंना
" एक कॉल आणि गाव विकासाबाबतचा आपला प्रॉब्लेम सॉल " अशीच खामसवाडी जिल्हा परिषद गटातील नागरीकांची सर्वत्र जोरात चर्चा सुरु आहे .



