पाथर्डी - ईटकूर रस्त्यावरील कुक्कुटपालन शेडमध्ये विषारी औषध टाकल्याने 160 गावरान कोंबड्यांचा मृत्यु
माऊली ॲग्रो फार्मचे मालक गणेश आडसुळ यांच्या फिर्यादी वरून अज्ञातां विरुद्ध कळंब पोस्टे मध्ये गुन्हा दाखल
देशभक्त न्युज - ईटकूर प्रतिनिधी / -
कळंब तालुक्यातील पाथर्डी - ईटकुर रोडवर, शेत गट नं 703 मधील माऊली ॲग्रो फॉर्म मधील गावरान कोंबड्यांना विषारी औषध टाकल्याने 160 गावरान कोंबड्यांचा मृत्यु झाला आहे फिर्यादी हे त्यांच्या कुटुंबासह लग्नानिमित्त बाहेरगावी गेले असता त्यांच्या घराच्या जवळ असलेल्या त्यांच्या कुक्कुटपालन शेड मध्ये कोणीतरी अज्ञात इसमाने विष प्रयोग करुन पशुंना जिवे मारण्याच्या हेतुने कांही तरी विषारी औषध टाकुन मौजे ईटकूर शिवारात दि 26.02.2026 रोजी 09.00 ते 23.00 वा च्या दरम्यान फिर्यादीच्या गावरान जातीच्या 160 कोबंड्या प्रत्येक एक कोंबडी किंमत अंदाजे 300 रुपये असे एकुण 48,000 रुपयाच्या कोबंड्या मरुन फिर्यादीचे नुकसान केले असल्यामुळे फिर्यादी गणेश अरुण आडसुळ वय 36 वर्षे व्यवसाय शेती व कुक्कुटपालन रा . ईटकुर ता . कळंब , जि . धाराशिव यांच्या तक्रारी वरून आरोपी अज्ञात ईसमा विरुद्ध पोस्टे कळंब येथे गुरनं 82/2026 कलम 325 भा. न्या. सं प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन प्रभारी पोनि. चिंतले यांच्या मार्गदर्शनाखाली पोना शिंदे यांनी रितसर गुन्हा नोंद करून घेवून अधिक तपास पोहेकॉ . देटे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे .
.
