Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

बावी येथे स्प्रिंकलर चे नोझल चोरीला गेल्यामुळे शेतकरी राजा त्रस्त

 बावी येथे स्प्रिंकलर चे नोझल चोरीला गेल्यामुळे शेतकरी राजा त्रस्त 

 ग्रामस्थांसह शेतकरी वर्गातुन  पोलीस गस्त ( पेट्रोलिंग ) ची मागणी..

                


               देशभक्त न्युज - अनिल धावारे   / -

वाशी तालुक्यातील बावी येथील मागील तीन महिन्यापासून गाव परिसरात चोऱ्यांचे सत्र थांबता थांबेना येरमाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेले गाव बावी येथील ट्रॅक्टरची ट्रॉली तसेच दुचाकी इतर छोट्या मोठ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढलेअसून व शेतकऱ्यांच्या स्पिंकलर नोजल चिमण्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. गुरव शेत परिसरात अरुण कावळे. चोरून नेलेले नोजल (१५) कट शिवरी वसंत शिंदे.(१२) रोहन शिंदे.(८) ऋषिराज शिंदे.(१६) अभिषेक शिंदे.(१२) विठ्ठल शिंदे.(१०) विठ्ठल निर्मळ.(१५) संभाजी शिंदे.(१४) या सर्व शेतकऱ्यांचे पिकांना स्पिंकलर द्वारे पाणी देण्याचे काम चालू असताना मध्यरात्रीच्या सुमारास तळे काट बावीशेत शिवार परिसरात प्रकार घडला आहे या घटनेमुळे शेतकरी वर्गात चिंतेचा वातावरण निर्माण झाले आहे. या अगोदर येरमाळा पोलीस स्टेशन येथे ट्रॅक्टरची ट्रॉली. दुचाकी चोरट्याविरुद्ध गुन्हे तर दाखल आहे परंतु तपास मात्र संत गतीने चालू आहे.आता स्प्रिंकलर नोजल चिमण्या चोरून नेणाऱ्या अज्ञात चोरट्या विरुद्ध येरमाळा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.अशा छोट्या-मोठ्या चोऱ्यामुळे शेतकरी व ग्रामस्थ मंडळी भयभीत झालेआहेत री पोलीस प्रशासनाने चोरट्यांच्या तात्काळ मुस्क्या आवळाव्यात आणि  परिसरात वारंवार  होत असलेल्या या चोऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी रात्रीची पेट्रोलिंग गस्त करण्यात यावी अशी गावकऱ्यांसह शेतकरी वर्गातुन मागणी होत आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.